Bhavya Gandhi : 'तारक मेहता...'च्या टप्पूला ओळखलंत का? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "काका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:30 IST2023-05-18T13:29:08+5:302023-05-18T13:30:56+5:30
२५ चा असून ३० चा दिसतोय, जीम लाव अशा प्रतिक्रिया त्याला येत आहेत.

Bhavya Gandhi : 'तारक मेहता...'च्या टप्पूला ओळखलंत का? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "काका..."
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मधील टप्पू सेना तर सगळ्यांनाच माहित आहे. दयाबेन आणि जेठालालचा मुलगा टप्पू म्हणजे गोकुलधाम सोसायटीतील बच्चे कंपनीचा लीडर. खोडकर पण तितकाच हळवा, दयाबेन आणि चंपकलाल आजोबांचा लाडका, भिडे मास्तरांचा कायम ओरडा खाणारा आणि हटके स्टाईलने केस उडवणारा टप्पू डोळ्यासमोर येतो. मालिका सुरु झाल्यानंतर अनेक वर्ष भव्य गांधीने (Bhavya Gandhi) टप्पूची भूमिका साकारली. आता मात्र त्याला बघितलंत तर ओळखूही येणार नाही की हा तोच छोटा टप्पू आहे.
भव्य गांधीचा आत्ताचा लुक पाहिलात तर तो खूप मोठ्या माणसारखा दिसत आहे. २५ चा असून ३० चा दिसतोय, जीम लाव अशा प्रतिक्रिया त्याला येत आहेत. काही वर्षांपूर्वीच भव्यने मालिका सोडली. सध्या तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याने आपले बरेच फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये त्याची अंगकाठी बघता तो खूपच मोठा दिसत आहे.
मालिका सोडल्यानंतर चाहत्यांनी टप्पूला खूप मिस केले. सध्या भव्य रिजनल प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तसंच तो लवकरच एका हिंदी सिनेमातही दिसणार आहे. मात्र भव्यचा बदललेला लुक नेटकऱ्यांच्या काही पचनी पडलेला दिसत नाही. अनेकांनी त्याला 'काका दिसतोय' असं म्हणत ट्रोलही केलं आहे.