'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:55 IST2025-09-03T12:48:23+5:302025-09-03T12:55:00+5:30
'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांच्या संसाराची राख रांगोळी

'तारक मेहता..'मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा ६० व्या वर्षी घटस्फोट, १५ वर्षांचा संसार मोडला
गायक-संगीतकार राहुल देशपांडेंच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सिंपल कौल. 'शरारत' आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सिंपल कौलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. तब्बल १५ वर्षांच्या संसारानंतर तिने पती राहुल लूंबापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
सिंपलने घेतला घटस्फोटाचा निर्णय
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिंपल कौलने या वृत्ताला दुजोरा दिला. तिने सांगितले की, हा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घेतला आहे. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या या निर्णयाचा आदर ठेवला आहे. सिंपल म्हणाली, "एका कुटुंबापुरतं आमचं नातं मर्यादित नाही. हे नातं त्यापलीकडचं आहे. आमच्या नात्यात सर्व संपलंय हे माझ्या डोक्यात येतच नाही, कारण मी राहुलला इतक्या वर्षांपासून ओळखते." अशा शब्दात सिंपलने राहुलच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
दरम्यान, सिंपलने घटस्फोटाचं नेमकं कारण सांगितलं नाही, मात्र तिच्या एका जुन्या मुलाखतीनुसार ती आणि तिचा पती राहुल लूंबा यांच्यात कामामुळे 'लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिप' होते. राहुल कामामुळे जास्त काळ परदेशात राहत होता. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंपलने याआधी हे स्पष्ट केलं होतं की, राहुल दूर राहत असल्यामुळे तिला तिच्या अभिनयावर आणि मुंबईतील तिच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली. सिंपल ६० वर्षांची असून तिने घटस्फोट घेतल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सिंपल एक यशस्वी उद्योजिका असून, तिचे अनेक रेस्टॉरंट आहेत.