पर्वतरांगामधून वाहणाऱ्या नदीत तन्वीचं River Rafting, अनुष्का सरकाटेनेही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:41 IST2024-06-09T16:40:41+5:302024-06-09T16:41:31+5:30
Tanvi mundale: तन्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मनाली ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री अनुष्का सरकाटेदेखील दिसून येत आहे.

पर्वतरांगामधून वाहणाऱ्या नदीत तन्वीचं River Rafting, अनुष्का सरकाटेनेही दिली साथ
'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले (tanvi mundale) या मालिकेत तिने साकारलेल्या कावेरी या भूमिकेला नेटकऱ्यांचं प्रचंड प्रेम मिळालं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. अलिकडेच तन्वीने तिच्या बिझी शेड्युलमधून ब्रेक घेत थेट मनाली गाठलं. तन्वी तिच्या गर्लगँगसोबत मनालीला गेली होती. इतकंच नाही तर तिने तिथे गेल्यावर रिव्हर राफ्टिंगचा अनुभवदेखील घेतला.
तन्वीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या मनाली ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री अनुष्का सरकाटेदेखील (anushka sarkate) दिसून येत आहे. म्हणजे तन्वी आणि अनुष्का या दोघीही त्यांच्या कामातून ब्रेक घेत सुट्टी एन्जॉय करायला गेल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर त्यांनी रिव्हर राफटिंगही केलं. या रिव्हर राफटिंगचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, तन्वी आणि अनुष्काचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. इतकंच नाही तर सेलिब्रिटींनीही त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.