मुनमुन दत्ताने घेतली ट्रोलर्सची शाळा; प्रेग्नंसी अन् साखरपुड्यावर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 12:51 IST2024-03-16T12:50:11+5:302024-03-16T12:51:37+5:30

Munmun dutta: मुनमुनने पोस्ट शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली आहे.

taarak-mehta-munmun-dutta-aka-babita-post-on-engagement-rumours-with-raj-anandkat-says-whether-i-marry-a-younger-man-or | मुनमुन दत्ताने घेतली ट्रोलर्सची शाळा; प्रेग्नंसी अन् साखरपुड्यावर सोडलं मौन

मुनमुन दत्ताने घेतली ट्रोलर्सची शाळा; प्रेग्नंसी अन् साखरपुड्यावर सोडलं मौन

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. या जोडीने गुपचूप पद्धतीने साखरपुडा केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं या दोघांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच तिच्या लग्नाविषयीदेखील भाष्य केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मुनमुनने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सततच्या होणाऱ्या ट्रोलिंग आणि चुकीच्या अफवांवर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाली मुनमुन?

हे अत्यंत हास्यास्पद आहे की, कशाप्रकारे खोट्या बातम्या वणव्यासारख्या वेगाने पसरवल्या जातात. आणि, बूमरँगसारखं त्या चघळल्याही जातात. पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी स्पष्ट करतीये. माझा साखरपुडा, लग्न झालेलं नाही आणि मी प्रेग्नंट सुद्धा नाही, असं म्हणत मुनमुनने सगळ्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

पुढे ती म्हणते, मी जेव्हा केव्हा लग्न करेन त्यावेळी तो मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठा तरी मला अभिमान वाटेल. माझ्या बंगाली रक्तामध्येच ती गोष्ट आहे. मी कायमच अभिमानाने आणि धीटाने सगळ्या गोष्टींना समोरी जाते. या अशा खोट्या गोष्टींसाठी मी माझी शक्ती वाया घालवू शकत नाही. त्यापेक्षा मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींना वेळ देईन.

दरम्यान, २०२१ मध्येही मुनमुन आणि राज यांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, या दोघांनी त्यावेळीही या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं. गेल्या १५ वर्षापासून मुनमुन दत्ता तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बबिताजी ही भूमिका साकारत आहे. तर, राजने ही मालिका कधीच सोडली आहे.

Web Title: taarak-mehta-munmun-dutta-aka-babita-post-on-engagement-rumours-with-raj-anandkat-says-whether-i-marry-a-younger-man-or