वेड लावलंय...! रितेश देशमुखच्या गाण्यावर थिरकला सूरज चव्हाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:37 IST2024-11-16T17:37:15+5:302024-11-16T17:37:56+5:30
Suraj Chavan : बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणने नुकतेच सोशल मीडियावर एक रिल शेअर केला आहे, ज्यात तो अभिनेता रितेश देशमुखचा मराठी सिनेमा वेडमधील हिट ठरलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे.

वेड लावलंय...! रितेश देशमुखच्या गाण्यावर थिरकला सूरज चव्हाण, व्हिडीओ होतोय व्हायरल
महाराष्ट्रातील छोट्याशा मोढवे गावातून आलेला सूरज चव्हाण (Suraj Chavan) आज संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला आहे. सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉस संपल्यानंतरही मातीशी जोडलेला सूरज नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान आता सूरजच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तो बिग बॉस मराठी ५चा होस्ट आणि सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखच्या वेड सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणने नुकतेच सोशल मीडियावर एक रिल शेअर केला आहे, ज्यात तो अभिनेता रितेश देशमुखचा मराठी सिनेमा वेडमधील हिट ठरलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. हे गाणं म्हणजे मला वेड लावलंय. या गाण्यावरील त्याच्या डान्सला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सूरज चव्हाणचं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेल्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही. ३० वर्षांचा सूरज चव्हाण फक्त आठवी पर्यंत शिकला आहे. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. टिकटॉक बंद झाल्यावर तो इन्स्टाग्राम रील्स बनवून लोकप्रिय झाला. सूरजकडे पैसा आणि प्रसिद्धी आल्यानंतर अनेकांनी त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला. अनेकदा त्याची फसवणूकही झाली. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात आल्यानंतर त्याच्या प्रेमळ स्वभावाने घरातील सदस्यांचेच नाही तर इतर सहस्पर्धकांचेही मनं जिंकले.
सूरजला मिळाली सिनेमाची ऑफर
सूरज बिग बॉस मराठी ५चा विजेता झाल्यावर कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याला सिनेमाची ऑफर दिली. 'झापुकझुपुक' असं या सिनेमाचं नाव असून यात सूरज प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर शूटदेखील झाल्याचे समजते आहे.