Sunil Grover Heart Surgery: सुनील ग्रोव्हरच्या सर्जरीबाबत ऐकून Kapil Sharma ला बसला धक्का, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 22:37 IST2022-02-04T22:37:22+5:302022-02-04T22:37:43+5:30
कपिलनं एका कॉमन मित्राकडून सुनीलच्या प्रकृतीची माहिती घेतली.

Sunil Grover Heart Surgery: सुनील ग्रोव्हरच्या सर्जरीबाबत ऐकून Kapil Sharma ला बसला धक्का, म्हणाला...
अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्माला (Kapil Sharma) मित्र सुनील ग्रोवरच्या (Sunil Grover) याच्या हार्ट सर्जरीबद्दल ऐकून धक्का बसला. तसंच त्यानं याबाबत चिंताही व्यक्त केली. सुनील ग्रोव्हरला काही दिवसांपूर्वी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. सुनील ग्रोव्हरला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला ब्लॉकेज आढळले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. बायपास सर्जरीनंतर सुनील ग्रोव्हरला ३ फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कपिल आणि सुनील काही वर्षांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'मध्ये एकत्र काम करत होते. या शोमध्ये सुनील 'गुत्थी' ही व्यक्तिरेखा साकारत होता, पण नंतर काही कालावधीनं सुनीलने काही कारणास्तव शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
जेव्हापासून कपिल शर्माला सुनील ग्रोव्हरच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने याबद्दल चिंता व्यक्त केली. टाईम्स ऑफ इंडियाशी साधलेल्या विशेष संवादात त्यानं यावर भाष्य केलं. "मला जेव्हा यासंदर्भात माहिती मिळाली तेव्हा मी शॉक्ड होतो. त्याच्या प्रकृतीबद्दल मला चिंता वाटत आहे. मी त्याला मेसेज केला आहे, परंतु आताच त्याला डिस्चार्ज दिल्यामुळे त्याचा रिप्लाय आला नाही. सध्या तो आराम करतोय. सध्या त्याला आरामाची गरज आहे. खुप कमी वयातच त्याची बायपास सर्जरी झाली. तो लवकरच बरा होईल," असं कपिल म्हणाला.
सुनीलच्या प्रकृतीबाबत एका कॉमन मित्राकडून माहिती घेतली. आम्ही दोघांनीही अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम केलंय. आमचे अनेक कॉमन मित्र आहेत. ते मला त्याच्या प्रकृतीची माहिती देत असल्याचंही तो म्हणाला.
चाहत्यांनाही बसला होता धक्का
सुनील ग्रोव्हरच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण सुनील ग्रोव्हर त्याच्या तब्येतीबाबत नेहमीच जागरुक राहणारा कलाकार आहे. गेल्याच महिन्यात फिल्मफेअरनं सर्वोत्तम कलाकार ओटीटी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 'झी फाइव्ह'वर आलेल्या 'सनफ्लॉवर' या वेबसीरिजसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता.
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वितुष्ट आता संपुष्टात आल्याचीही माहिती समोर आली होती. अभिनेता सलमान खान यानं दोघांमध्ये मध्यस्ती करुन वाद मिटवल्याचं बोललं जात होतं. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून मायदेशात परतत असताना विमानात आणि त्याआधी बॅकस्टेजवर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर सुनील ग्रोव्हरनं कपिल शर्मा शो सोडला होता.