कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:35 IST2026-02-03T16:34:15+5:302026-02-03T16:35:09+5:30
कोल्हापूर मधील सर्वात मोठा खटला; सावी निर्दोष सुटू शकेल?

कोल्हापूरच्या रस्त्यावर #JusticeForSavi चे पोस्टर्स का झळकतायत? काय सुरु आहे जाणून घ्या
कोल्हापूरच्या रस्त्यावर एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सावीला न्याय मिळावा अशा आशयाचे हे बॅनर आहेत. 'सन मराठी' वरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत सावी कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. कोल्हापूर मध्ये सर्वत्र #Justiceforsavi असे बॅनर झळकताना दिसत आहेत. मालिकेत काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद हा व्यक्ती आला. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करत स्वतःच्या बिझनेस साठी त्याने सावीकडे मदत मागितली. मदतीसाठी होकार देऊन सावी नकळत या प्रकरणात अडकली. सावीवर अंगदला आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्याचा आणि अंगदचा विनयभंग केल्याचा आरोप लावून अटक करण्यात येते.
खरंतर सावीला धैर्य च्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी दामिनीनेच सावीविरोधात हा कट रचला आहे. धैर्यचा सावीवर विश्वास आहे. पण त्याच्या आजारपणाचा फायदा घेत दामिनी आणि घरातील इतर सदस्य त्याला सावीपासून लांब ठेवत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार ? धैर्यची साथ नसताना सावी या अन्यायाविरोधात कशी उभी राहील? सावी निर्दोष सुटू शकेल का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण या प्रकरणात सावीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी पंचकन्यांची साथ तिला मिळणार आहे.
इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणी देखील सावी सोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी मनू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील? आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.