आज मैं उपर..! गिरीजा प्रभूच्या धाडसाचं होतंय कौतुक; हिमाचलमध्ये केलं water Zipline
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:50 IST2024-05-13T11:49:55+5:302024-05-13T11:50:38+5:30
Girija prabhu: गिरीजाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे, कडाक्याच्या थंडीत तिला असं वॉटर स्पोर्टर करतांना पाहून चाहते थक्क झाले आहेत.

आज मैं उपर..! गिरीजा प्रभूच्या धाडसाचं होतंय कौतुक; हिमाचलमध्ये केलं water Zipline
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू (girija prabhu). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर गिरीजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. यात सध्या तिचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. गिरीजाने हिमाचलमध्ये चक्क कडाक्याच्या थंडीत water Zipline केलं आहे.
सध्या गिरीजा तिच्या कुटुंबासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. गिरीजा उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेली असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यामध्येच तिने water Zipline करतांनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, गिरीजाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे, कडाक्याच्या थंडीत तिला असं वॉटर स्पोर्टर करतांना पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्यामुळे सध्या तिचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. तिच्या या साहसाचं कौतुक सामान्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही केलं आहे.