राया सगळ्यांसमोर आणू शकेल का इन्स्पेक्टर घोरपडेचा खोटारडेपणा; 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:56 IST2025-02-03T10:52:56+5:302025-02-03T10:56:28+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे.

star pravah yed lagal premach serial new twist will raya be able to expose inspector jay ghorpade promo viral | राया सगळ्यांसमोर आणू शकेल का इन्स्पेक्टर घोरपडेचा खोटारडेपणा; 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये रंजक वळण

राया सगळ्यांसमोर आणू शकेल का इन्स्पेक्टर घोरपडेचा खोटारडेपणा; 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये रंजक वळण

Yed Lagla Premach: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. गतवर्षी २७ मे २०२४ ला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. अगदी अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळते आहे. शिवाय संग्राम साळवी, नीना कुलकर्णी, आतिशा नाईक अशी तगडी कलाकार मंडळीमालिकेत पाहायला दिसते आहे. नेहमीच एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यांच्यातील मैत्रीचा बॉण्ड त्यांना आवडतो आहे. दरम्यान, सध्या मालिकेत मंजिरीला विषबाधा झाली असल्याचा सीक्वेंस चालू आहे. अशातच मालिकेचा नवीन समोर आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


दरम्यान, सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीकडून 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. सध्या या मालिकेत दिवसेंदिवस ट्विस्ट पाहायला मिळतायत. इकडे मंजिरीसोबत आपलं लग्न व्हावं अशी स्वप्न इन्स्पेक्टर घोरपडेसोबत रंगवू लागला आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायला तो तयार असतो. अशातच मालिकेत मंजिराला विषबाधा झाल्याचं पाहायला मिळतंय, आणि या कटकारास्थानामागे जयचा हात असल्याचा संशय रायाला असतो. त्याच्या या कुकर्माचा अखेर राया पर्दाफाश करणार असल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, मंजिरीला जेवणात विषबाधा झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यावेळी घरातील प्रत्येकजण तिच्या काळजीत अस्वस्थ झालाचे पाहायला मिळत आहेत. त्यादरम्यान प्रोमोमध्ये मंजिरी आई म्हणजेच नानी म्हणते, "काय होतंय आपल्या मंजिराला ही कसली पीडा तिच्या मागे लागली आहे. "त्यानंतर राया मंजिराच्या घरच्यांसमोर तिच्या बहिणीच्या नवऱ्याला हजर करतो. त्यावेळी राया म्हणतो, "या पीडेमागचं कारण आहे हा बेईमान जावई. याच्यामुळेच मिसफायर आजारी पडली आहे. जयसोबत हात मिळवणी करुन याने मंजिरीला विष खाऊ घातलं." हा धमाकेदार प्रोमो पाहून प्रेक्षकांना आता पुढे काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता  लागली आहे. त्यामुळे आता रायाचा खरेपणा जिंकतो की इन्सपेक्टर घोरपडेचा खोटारडेपणा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: star pravah yed lagal premach serial new twist will raya be able to expose inspector jay ghorpade promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.