निरुपाच्या मायेच्या स्पर्शाने सत्या सुखावणार; 'साधी माणसं' मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, प्रेक्षक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:41 IST2025-03-21T16:36:18+5:302025-03-21T16:41:54+5:30
'साधी माणसं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

निरुपाच्या मायेच्या स्पर्शाने सत्या सुखावणार; 'साधी माणसं' मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, प्रेक्षक म्हणाले...
Sadhi Manasa Promo: 'साधी माणसं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेल्यावर्षी १८ मार्च २०२४ ला मालिकेला पहिला भाग प्रसारित करण्यात आला. अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची मालिकेत प्रमुख भूमिका आहे. या मालिकेत शिवानी मीरा, तर आकाशने सत्या नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. एकमेकांचे विरुद्ध स्वभाव असलेल्या सत्या आणि मीराने मालिका रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. नुकताच ‘साधी माणसं’चा हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकदेखील सुखावले आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीकडून सोशल मीडियावर 'साधी माणसं' मालिकेचा आगामी प्रोमो शेअर करण्यात आला आहे. सध्या मालिकेमध्ये सत्याचे वडील आजारी असल्याचा सीक्वेंस दाखवण्यात आला आहे. या सगळ्यातून बाहेर येत होळीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. लेक पंकजसाठी कायम सत्याला वाईट ठरवणारी सावत्र आई निरुपा पहिल्यांदाच व्यक्त होताना दिसणार आहे. सत्याचा नेहमीच तिरस्कार करणारी भांग पिऊन नशेत असलेली निरुपा त्याला मायेनं जवळ घेत असल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. तर लाडका लेक पंकजच्या ती कानशिलात लगावते. याशिवाय प्रोमोमध्ये मीराचं देखील कौतुक करताना दिसत आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, साधी माणसं ही मालिका सोमवार ते शनिवार रोज दुपारी १:00 वाजता प्रसारित करण्यात येते. सोशल मीडियावर शेअर केलेला भाग येत्या रविवारी २३ मार्चला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.