कलाच्या प्रेमाचा आवाज अद्वैतपर्यंत पोहोचणार का? लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत रंजक वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:41 IST2025-04-18T14:38:24+5:302025-04-18T14:41:55+5:30
छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत असून ती घराघरात पोहोचली आहे.

कलाच्या प्रेमाचा आवाज अद्वैतपर्यंत पोहोचणार का? लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत रंजक वळण
Laxmichya Paulanni : छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत असून ती घराघरात पोहोचली आहे. टीआरपीमध्येही ही मालिका आपलं स्थान रोवून उभी आहे. अभिनेत्री इशा केसकर आणि अभिनेता अक्षय कोठारी यांची मुख्य भूमिका ही असलेली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अद्वैत आणि कलाच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. सध्या या मालिकेत कला-अद्वैतमध्ये प्रेमाचं नातं बहरत असल्याचा सीक्वेंस दाखवण्यात येत आहे. याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश आहेत.
सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. "कलाच्या प्रेमाचा आवाज अद्वैत पर्यंत पोहोचणार का?" असं कॅप्शन देत मालिकेचा आगामी भागामध्ये काय घडणार याची झलक दाखवण्यात आली आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, कला आणि अद्वैत शुद्धीत नसतात त्याचदरम्यान भर बाजारात कला तिच्या मनातील भावना अद्वैतसमोर व्यक्त करते. त्यावेळी कला त्याला जवळ ओढते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, 'खरे मी शुद्धीत नाही सोड, चार लोकं बघतायत'. 'लोकांकडे बघण्यापेक्षा तू माझ्याकडे बघ ना' असं म्हणत कला त्याची बोलती बंद करते. त्यावर अद्वैत म्हणतो, 'खरे तुझे वागणे नव्हे बरे'. चांदेकरचं ते बोलणं ऐकून कला त्याला सांगते, 'आता कुठे सूर जुळलेत अरे, आय लव्ह यू चांदेकर..!' म्हणत कला सगळ्यासमोर अद्वैतला प्रपोज करते. दरम्यान, हा प्रोमो पाहून मालिका रसिक सुखावले आहे.
लक्षमीच्या पावलांनी मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना रविवार 20 एप्रिल दु.3 आणि संध्या.5 वा. स्टार प्रवाह वर पाहता येणार आहे. पण, हे सत्य असणार की कलाचं स्वप्न असणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.