Boss Mazi Ladachi : ‘बॉस माझी लाडाची’मध्ये नवी एन्ट्री, प्रेक्षकांचं वाढलं टेन्शन...! काय आहे ही नवी भानगड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 10:20 IST2022-07-30T10:17:49+5:302022-07-30T10:20:39+5:30
Boss Mazi Ladachi Promo : मालिकेत नवी एन्ट्री होणार म्हटल्यावर नवा ट्विस्ट येणार, हे ठरलेलं. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी मालिकांमध्ये नवे नवे कलाकार पाहायला मिळाले. आता आणखी एका मालिकेत नवी एन्ट्री होतेय.

Boss Mazi Ladachi : ‘बॉस माझी लाडाची’मध्ये नवी एन्ट्री, प्रेक्षकांचं वाढलं टेन्शन...! काय आहे ही नवी भानगड?
मालिकेत नवी एन्ट्री होणार म्हटल्यावर नवा ट्विस्ट येणार, हे ठरलेलं. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी मालिकांमध्ये नवे नवे कलाकार पाहायला मिळाले. आता आणखी एका मालिकेत नवी एन्ट्री होतेय. होय, सोनी मराठीवरील ‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi) या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा नवा चेहरा कुणाचा? तर अभिनेता तेजस बर्वे (Tejas Barve) याचा.
झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत तेजस बर्वेला तुम्ही पाहिलं असेलच. या मालिकेत त्याने सुमीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. हो, तोच तो सुमीचा लाडका पायलट नवरा. ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा तेजस घराघरात पोहचला होता. आता तो ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत धमाकेदार एन्ट्री घेतोय.
‘बॉस माझी लाडाची’चा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये तेजस बर्वेची बॉसच्या ऑफिसमध्ये एंट्री झालेली दाखवली आहे. या मालिकेत तेजस कोणती भूमिका साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण प्रोमो पाहता तो बॉसला टक्कर द्यायला आला आहे असं सध्या दिसतंय. प्रोमोमध्ये तेजस हा बॉसच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बसलेला आहे. बॉस कसा असावा हे तो त्यांना समजावून सांगत आहे. मालिकेत आतापर्यंत एकच बॉस होती पण आता कदाचित बॉसच्या बॉसची मालिकेत एंट्री होणार असं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार, हे नक्की.
‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत नुकतच बॉस आणि महिरचं लग्न झालेलं दाखवलंय. आत्ताकुठे बॉस आणि मिहिर यांच्यात रोमान्स फुलू लागला होता. विशेष म्हणजे प्रेक्षकांना हा ट्रॅक आवडला होता.
चाहते म्हणाले, बोरिंग...
बॉसच्या बॉसची एन्ट्री झाली असती तरी प्रेक्षकांना ती फार आवडली नसल्याचं सध्या तरी दिसतंय. प्रोमोवरच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहून तरी तेच वाटतंय. आजचा एपिसोड आवडला नाही. ते नवीन कॅरेक्टर फार बोरिंग आहे. बॉस आणि मिहिरची लव्ह स्टोरी दाखवा बास, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. आता हा कोणीही असो. पण मिहिर आणि बॉसच्या मध्ये आणू नका रे बाबा. सध्या मिहिर आणि बॉसची लव्हस्टोरी बघायला आवडत आहे, अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली आहे. आता चाहत्यांचा हिरमोड होतो की मालिका आणखी रंजक बनते, ते बघूच.