"रितेश शो खूप चांगला होस्ट करत आहेत, पण..."; बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सोनाली राऊत स्पष्टच म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:25 IST2026-02-14T13:23:39+5:302026-02-14T13:25:29+5:30

घराबाहेर पडण्याच्या आठवड्याभरापूर्वी सोनालीला सूत्रसंचालक रितेश देशमुखने चांगलंच सुनावलं होतं. आता घराबाहेर आल्यावर सोनालीने रितेशबद्दल तिचं निरीक्षण नोदवलं आहे.

Sonali Raut said clearly after leaving Bigg Boss marathi 6 host riteish deshmukh | "रितेश शो खूप चांगला होस्ट करत आहेत, पण..."; बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सोनाली राऊत स्पष्टच म्हणाली

"रितेश शो खूप चांगला होस्ट करत आहेत, पण..."; बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सोनाली राऊत स्पष्टच म्हणाली

'बिग बॉस मराठी ६' मधून सोनाली राऊत काही आठवड्यांपूर्वी घराबाहेर पडली. सोनालीचं एविक्शन सर्वांसाठी धक्कादायक होतं. कारण सोनाली घरातील एक स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. घराबाहेर पडण्याच्या आठवड्याभरापूर्वी सोनालीला सूत्रसंचालक रितेश देशमुखने चांगलंच सुनावलं होतं. आता घराबाहेर आल्यावर सोनालीने रितेशबद्दल तिचं निरीक्षण नोदवलं आहे.

इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, ''रितेश देशमुख जे आमच्या शोचे होस्ट आहेत त्यांच्याकडूनही त्या गोष्टीसाठी खूप ओव्हर रिअॅक्शन मिळालं होतं. मी रितेशला बाहेरुन ओळखते. रितेश शो खूप चांगलं होस्ट करत आहेत. त्यांचा मराठी बिग बॉसचा हा दुसरा सीझन आहे. खूप चांगलं काम करत आहेत. पण मला वाटतं, त्यांच्याकडून मला जी प्रतिक्रिया मिळाली, ती खूप जास्त होती. घराच्या आत घडलेल्या खूप अशा गोष्टी आहेत, ज्या त्यांनाही माहित नसतात. त्या गोष्टी मी त्यांना नक्कीच सांगेन. पण मी दुखावले गेले आणि याचा परिणाम माझ्या गेमवरही झाला.'' 


''मला वाटतं, सूत्रसंचालक म्हणून त्यांचा मराठीतला हा दुसरा सीझन आहे. त्यामुळे ते सुद्धा काहीसे तणावात असतील. कारण बिग बॉसचे इतर प्रादेशिक शो सुद्धा आहेत. त्यामुळे सातत्याने त्या शोमधील सूत्रसंचालकाशी तुलना होत असते. ते मुंबईत आहेत म्हणून हिंदी-मराठीसोबत त्यांची तुलना होत असते. माझ्या मते, ते त्यांंचं एक व्यक्तिमत्व बनवत आहेत. ते शोमध्ये मी किती गंभीर आणि इंटेन्स आहेत, हे दाखवत आहेत. कोणी चुकत असेल तर ते त्याला ओरडतील, समजावतील, त्यांना काय करायचं आहे ते सांगतील.''

''पहिल्याच भागात जेव्हा ते आले होते, तेव्हा ते खूप रागात होते. स्पर्धक म्हणून आम्ही गोंधळात होते की, हे इतकी ओव्हर रिअॅक्शन का देत आहेत? कारण आम्ही शिवीगाळ,  हिंसा अशा गोष्टी आतमध्ये केल्या नव्हत्या. परंतु ते खूप 'अँग्री होस्ट' म्हणून समोर आले. आता ते शोला फॉलो करत आहेत, की त्यांना सांगितलं जातंय, की हे फॉलो करुन ते स्वतःची इमेज अशी बनवत आहेत, हे आम्हाला माहिती नाही.''

Web Title : रितेश अच्छी मेजबानी करते हैं, लेकिन सोनाली राउत ने बिग बॉस के बाद कहा।

Web Summary : सोनाली राउत, जो बिग बॉस मराठी 6 से बाहर हो गईं, ने महसूस किया कि रितेश देशमुख ने उनकी हरकतों पर ज़्यादा प्रतिक्रिया दी। उन्होंने उनकी मेजबानी कौशल को स्वीकार किया, लेकिन कहा कि प्रतिक्रिया ने उनके खेल पर नकारात्मक प्रभाव डाला। वह उनसे घर की अनदेखी घटनाओं पर चर्चा करना चाहती हैं।

Web Title : Ritesh hosts well, but Sonali Raut speaks out post Bigg Boss.

Web Summary : Sonali Raut, evicted from Bigg Boss Marathi 6, felt Ritesh Deshmukh overreacted to her actions. She acknowledged his hosting skills, but noted the reaction impacted her game negatively. She intends to discuss unseen house events with him.