"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:11 IST2023-09-01T12:10:25+5:302023-09-01T12:11:33+5:30

"बनू डार्लिंग", स्नेहल शिदमने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

snehal shidam shared special post for maharashtrachi hasyajatra fame nikhil bane on his birthday seeking attention | "लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. प्रत्येक घराघरात हा शो अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील विनोदवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. अभिनयाबरोबर विनोदाची उत्तम सांगड घालत हास्यजत्रेत कलाकार स्किट सादर करतात. अनेक नवोदित कलाकारांना हास्यजत्रेमुळे कलाविश्वात करिअर करण्याची संधी मिळाली. अभिनेता निखिल बनेही हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचला. हास्यजत्रेतील लाडक्या बनेचा आज वाढदिवस आहे. 

हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी बनेला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमनेही बनेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निखिल बनेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने  "बनू  डार्लिंग...हॅपी बर्थडे. लव्ह यू बेबी" असं कॅप्शनही दिलं आहे. तिच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

दरम्यान, स्नेहलने याआधीही निखिल बनेबरोबरचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, असं काहीच नसून आम्ही केवळ मित्र असल्याचा खुलासा करत बनेने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. बने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो कुटुंबीयांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असतो. बने 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेतही दिसला होता. 

Web Title: snehal shidam shared special post for maharashtrachi hasyajatra fame nikhil bane on his birthday seeking attention