"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:28 IST2025-11-03T16:27:57+5:302025-11-03T16:28:35+5:30
'आभास हा' गाण्यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्मिता शेवाळे मेंटल हेल्थबद्दल म्हणाली...

"मी काही वर्ष नैराश्यात होते...", स्मिता शेवाळेचा खुलासा; एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
अभिनेत्री स्मिता शेवाळे मराठी टीव्ही, सिनेमांमधला लोकप्रिय चेहरा आहे. गेल्या वर्षापर्यंत ती स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'मुरांबा' मालिकेत दिसत होती. नंतर तिने ती मालिका सोडली. स्मिताच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. तिचा घटस्फोट झाला असून आता ती एकटीच मुलाचा सांभाळ करत आहे. सध्या ती सिनेमा आणि तिच्या युट्यूब चॅनलचंच काम करत आहे. आयुष्यातील घडामोडींनंतर नैराश्यात गेल्याचा तिने नुकताच खुलासा केला.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्मिता शेवाळे म्हणाली, "माझ्या आयुष्यात अनेक मोठ्या घडामोडी होऊन गेल्या. एवढी उलथापालथ झाल्यानंतर मी साहजिकच काही वर्ष नैराश्यात होते. त्यानंतर समुपदेशानंतर मला सेल्फ अवेअरनेस वाढवावा लागला. तिथे मला लक्षात आलं की आपल्याला स्वत:वर काम करणं गरजेचं आहे. मी स्वत:शी कनेक्ट व्हायला शिकले. काही वेळेला मला मेडिकल आधारही घ्यावा लागला. पण तिथूनच मला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली."
स्मिताने २०१३ रोजी निर्माता राहुल ओडकशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर १२ वर्षांनी ते वेगळे झाले आहेत. स्मिता दिग्पाल लांजेकरांच्या आगामी 'अभंग तुकाराम' सिनेमात दिसणार आहे. तिने याआधीही दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' आणि इतर सिनेमातही काम केलं आहे. तसंच तिच्या युट्यूब चॅनलला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.