​भाभीजी घर पर है फेम आसिफ शेखला अभिनयासोबतच या क्षेत्रात होता रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 17:03 IST2018-01-08T11:33:10+5:302018-01-08T17:03:10+5:30

आसिफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने छोट्या पडद्यावर आज त्याचे एक प्रस्थ निर्माण ...

Sister-in-law is at home Fame Asif Sheikh is also interested in this area | ​भाभीजी घर पर है फेम आसिफ शेखला अभिनयासोबतच या क्षेत्रात होता रस

​भाभीजी घर पर है फेम आसिफ शेखला अभिनयासोबतच या क्षेत्रात होता रस

िफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने छोट्या पडद्यावर आज त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. आसिफने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करून आज अनेक वर्षं झाली आहेत. हम लोग या प्रसिद्ध मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो मेहेंदी तेरे नाम की, यस बॉस यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकला. आजवर त्याच्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक झाले आहे. याचसोबत तो अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने पहेली, जोडी नं १, कुवारा, बंधन, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो भाभीजी घर पर है या &TVच्या मालिकेत विभूतीची भूमिका साकारत आहे. 
विभूती या भूमिकेद्वारे तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आसिफ गेली अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात असला तरी त्याच्या अनेक गोष्टींविषयी त्याच्या फॅन्सना माहीतच नाहीये. आसिफ शेख एक मेहनती अभिनेता असून त्याचे अभिनय कौशल्य नेहमीच वाखाणण्यात आले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की तो चांगला अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला चांगला क्रिकेटरदेखील आहे. 
आसिफ शेखला क्रिकेट खेळायला फार आवडते. त्याचे वडील भारतीय रेल्वेमध्ये कामाला होते आणि आसिफच्या घरासमोरच एक क्रिकेटचे मोठे मैदान होते. तो लहानपणापासूनच या मैदानावर क्रिकेट खेळायचा. आसिफ सहावीत असल्यापासूनच त्याला क्रिकेटची गोडी लागली. क्रिकेटविषयी असणार्‍या प्रेमाबद्दल त्याला विचारले असता आसिफ शेखने सांगितले, “मी लहान असल्यापासूनच मला क्रिकेट खूप आवडते. क्रिकेटमध्ये मला व्यावसायिक प्रशिक्षण घेता आले नाही. पण शाळेत असताना मी बर्‍याच स्पर्धा जिंकल्या असून पुरस्कार मिळविले आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रीय पातळीवर मी माझ्या शाळेचे प्रतिनिधीत्वदेखील केले आहे. मला जर अभिनयात यश मिळाले नसते, तर मी नक्कीच क्रिकेटच्या क्षेत्रात करियर केले असते.”

Read : ​भाभीजी घर पर है या मालिकेतील आसिफ शेखचा नवा लूक तुम्ही पाहिला का?



Web Title: Sister-in-law is at home Fame Asif Sheikh is also interested in this area