"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:27 IST2026-03-16T10:23:45+5:302026-03-16T10:27:43+5:30
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये..."; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच प्राजक्ता शुक्रेने मनातलं सांगितलं, पोस्ट चर्चेत
'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून काल गायिका प्राजक्ता शुक्रेचा प्रवास संपला. प्राजक्ताने 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात तिच्या उत्कृष्ट खेळाने बाजी मारली. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून प्राजक्ता खेळात कुठेतरी कमी पडत होती. त्यामुळेच 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून प्राजक्ताचा प्रवास संपला. कमी मतं मिळाल्याने प्राजक्ताला एलिमिनेट व्हावं लागलं. घराबाहेर आल्यावर प्राजक्ताने पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहून सांगितलंय की, ''गायक म्हणून सुरू झालेला प्रवास तुमच्या प्रेमामुळे इथ पर्यंत येऊ शकला. बिग बॉसच्या घरात जाण्याचे खूप निकष असतात पण त्यातला एक निकष कॉमन आहे तो म्हणजे मनोरंजन ! आजवर माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करत आले, घरातल्या कर्ण कर्कश्य आवाजामध्ये माझा एक आवाज काही काळापूर्ती शांतता निर्माण करत होता याचा खूप आनंद आहे. बाकी आपली भेट होत राहील, माध्यम वेगळं असेल. खूप आभार!''
''या घरात दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार. तुमचा प्रत्येक वोट, प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. हा प्रवास इथे थांबत असला तरी तुमचं प्रेम कायम सोबत राहील. भेटत राहूया'', अशाप्रकारे प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्राजक्ता आणि करण सोनावणे या दोघांची मैत्री 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात चांगलीच गाजली. करण प्राजक्ताच्या आधीच एलिमिनेट झालाय. आता घराबाहेर आल्यावर हे दोघे एकमेकांना भेटणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.