दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:20 IST2024-06-23T14:18:46+5:302024-06-23T14:20:13+5:30

shweta khatat: सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता ढगाळ वातावरणाचा आनंद घेत आहे.

Shweta danced to a Bollywood song in dense fog; The video on Kaspathar is viral | दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल

दाट धुक्यात श्वेताने केला बॉलिवूड गाण्यावर डान्स; कासपठारवरील व्हिडीओ व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात (shweta kharat). उत्तम अभिनयासह श्वेता तिच्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणामुळेही कायम चर्चेत असते. श्वेताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं असून तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. श्वेता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्वेता ढगाळ वातावरणाचा आनंद घेत आहे. पाऊस पडण्यापूर्वी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे श्वेताचं मन मोहरून गेलं आहे. त्यामुळेच या वातावरणात डान्स करण्याचा मोह तिला आवरला नाही.

दाट धुक्यामध्ये श्वेताने 'इधर चली मैं, उधर चली' या गाण्यावर ताल धरला. विशेष म्हणजे यावेळी तिने नो मेकअप लूक केल्याचं पाहायला मिळालं.  सोबतच तिने जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिले आहेत.

दरम्यान, श्वेताने सातारमधील कासपठार येथे हा व्हिडीओ शूट केला आहे.  अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली श्वेता सध्या 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत झळकणार आहे. यापूर्वी तिने 'मन झालं बाजिंद,' राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं आहे.

Web Title: Shweta danced to a Bollywood song in dense fog; The video on Kaspathar is viral