'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 17:31 IST2023-05-26T17:31:05+5:302023-05-26T17:31:21+5:30

Aai Kuthe Kay Karte : यश गेल्या काही दिवसांपासून खूपच एकाकी राहू लागला आहे. गौरीच्या विरहात तो डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःच्या विचारांत गुंतलेला आहे.

Shocking twist in 'Aai Kuthe Kay Karte', Yash attempt suicide | 'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वीच आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत विणाची एन्ट्री झाली. अनिरुद्ध आणि वीणा यांची वाढलेली जवळीक पाहून अरुंधती आणि संजना तिला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजनाला रस्त्यावर उभे राहिलेले पाहून अनिरुद्ध तिची विचारपूस करतो. हे पाहून  वीणाला त्यांच्यातील बॉंडिंग खूप छान असल्याचा भास होतो. पण अनिरुद्धच्या गोड बोलण्याला फसू नकोस अशी कानउघडणी संजना करताना दिसते. त्यामुळे अनिरुद्धचा डाव वीणा ओळखणार की त्याच्या जाळ्यात अडकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास या मालिकेत आजच्या भागात प्रेक्षकांना धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

यश गेल्या काही दिवसांपासून खूपच एकाकी राहू लागला आहे. गौरीच्या विरहात तो डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःच्या विचारांत गुंतलेला आहे. ईशाच्या साखरपुड्यावेळी यशला पॅनिक अटॅक येऊन गेला होता. त्यामुळे सर्वजण त्याची खूप काळजी घेत होते. मात्र आता यश एक चुकीचे पाऊल उचलताना दिसणार आहे. आशुतोष सोबत फोनवर बोलताना यशला खूप अस्वस्थ जाणवत होते. त्यामुळे आशुतोष यशला बोलते करण्याचा प्रयत्न करतो. यशला नक्कीच काहीतरी होतेय याची कुणकुण आशुतोषला लागली होती. मात्र तो चुकीचे काही पाऊल टाकेल याचा विचारच त्याने केलेला नव्हता, त्यामुळे आशुतोष निर्धास्त राहिला. पण इकडे यश कुठेच दिसत नसल्याने आणि त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने ईशाला त्याची खूप काळजी वाटत होती.

ईशा थेट आशुतोषकडे येते. यश घरी नाही, तो त्याच्या स्टुडिओत सुद्धा नाही आणि त्याचा फोन सुद्धा बंद आहे. म्हणून सगळे जण काळजी व्यक्त करतात. तितक्यात यशचा अपघात झाल्याची बातमी हॉस्पिटलकडून येते तेव्हा सर्वजण तिकडे धाव घेतात. या अपघातात यशच्या डोक्याला दुखापत झालेली दाखवली आहे. त्यामुळे सगळेजण यशची करतात.

यशने आत्महत्येचा प्रयत्न केला हे अरुंधतीला अजून तरी समजलेले नाही. मात्र ही गोष्ट तिला समजल्यावर अरुंधती कोणता निर्णय घेणार याकडे प्रेक्षक लक्ष देऊन आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट यशचे आयुष्य बदलून जाणार असे वाटते. यश आणखी कोणते चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून अरुंधती आता कुठला निर्णय घेते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: Shocking twist in 'Aai Kuthe Kay Karte', Yash attempt suicide