शिव ठाकरेने दिली प्रेमाची कबुली? शेअर केला रोमँटिक फोटो, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 10:35 IST2024-08-01T10:34:10+5:302024-08-01T10:35:08+5:30

शिवने मिस्ट्री गर्ससोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

Shiv Thakre shared photo with mistery girl gave confession of Love fans curious | शिव ठाकरेने दिली प्रेमाची कबुली? शेअर केला रोमँटिक फोटो, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल'?

शिव ठाकरेने दिली प्रेमाची कबुली? शेअर केला रोमँटिक फोटो, कोण आहे ती 'मिस्ट्री गर्ल'?

बिग बॉस मराठी सिझन 4 चा विजेता, अमरावतीचा वाघ शिव ठाकरे (Shiv Thakre)  प्रेक्षकांचा लाडका आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत. आपल्या साधेपणाने तो नेहमी प्रेक्षकांचं मन जिंकतो. बिग बॉसमध्ये असताना त्याचं वीणा जगतापसोबत अफेअर चर्चेत होतं. नंतर डेझी शाहसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. आता नुकतंच शिवने मिस्ट्री गर्ससोबत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यात त्याने मुद्दामून तिचा चेहरा लपवला आहे.

शिव ठाकरेने सोशल मीडियावर नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने मिस्ट्री गर्लला आपल्या मिठीत घेतलं आहे. तिच्या कपाळावर तो kiss करताना दिसत आहे. फोटोत मिस्ट्री गर्लचा चेहरा लपवत त्याने हार्ट इमोजी लावला आहे. यामुळे ती मुलगी नक्की कोण आहे हे स्पष्ट होत नाही. 

शिवने शेअर केलेल्या या फोटोनंतर चाहत्यांनीही अंदाज लावायला सुरुवात केली आहे. शिव खरंच कोणाच्या प्रेमात आहे की हा त्याचा पब्लिसिटी स्टंट आहे अशीही शक्यता आहे. दरम्यान सोशल मीडियावर शिवच्या चाहतावर्गाने मिस्ट्री गर्लचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शिवने सर्वांनाच संभ्रमात टाकलं आहे.

शिव ठाकरेचे सध्या त्याच्या आजीसोबतचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अमरावतीमध्ये तो कुटुंबासोबत छान वेळ घालवतोय. याशिवाय त्याचे रिएलिटी शो, आगामी प्रोजेक्ट्स सुरु आहेत.

Web Title: Shiv Thakre shared photo with mistery girl gave confession of Love fans curious