शिव ठाकरेने पटकावलं The 50 शोचं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाली 'इतकी' रक्कम, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:01 IST2026-03-23T08:59:15+5:302026-03-23T09:01:33+5:30
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'द फिफ्टी'च्या पहिल्या सीझनचा तो विजेता ठरला आहे. शिवला विजयी रक्कम म्हणून तब्बल ५० लाख मिळाले आहेत. परंतु ही रक्कम शिवला मिळणार नाही. कारण काय?

शिव ठाकरेने पटकावलं The 50 शोचं विजेतेपद, ट्रॉफीसह मिळाली 'इतकी' रक्कम, पण...
आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि खेळाने प्रेक्षकांची मने जिंकणारा 'आपला माणूस' शिव ठाकरे याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'द फिफ्टी'च्या (The 50) पहिल्या सीझनचा तो विजेता ठरला आहे. शिव विजेता होणार ही बातमी काही दिवसांपूर्वी बाहेर आली होती. परंतु त्यावेळी फक्त चर्चा होती. पण आता शिव खरंच विजेता झाल्याने सर्वांना आनंद झाला आहे. शिवला विजयी रक्कम म्हणून तब्बल ५० लाख मिळाले आहेत. परंतु ही रक्कम शिवला मिळणार नाही. कारण काय? जाणून घ्या
१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या शोमध्ये मनोरंजन आणि सोशल मीडिया विश्वातील ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीनंतर शिव ठाकरेने मिस्टर फैसू, काका जी, रजत दलाल आणि कृष्णा श्रॉफ यांना मागे टाकत 'द फिफ्टी'ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. शिवने यापूर्वी 'बिग बॉस मराठी २'चे विजेतेपद पटकावले आहे, तर तो 'बिग बॉस १६'चा रनर-अप देखील राहिला आहे. आता शिवच्या कारकीर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ग्रँड फिनालेमध्ये शिवला विजेतेपदाची ट्रॉफी आणि ५० लाख रुपये प्राईज मनी मिळाली. शोच्या नियमानुसार, शिवच्या रजिस्टर फॉलोअर्सपैकी एका भाग्यवान चाहत्याला ही बक्षीस रक्कम देण्यात येणार होती. शिवचा सर्वात मोठा चाहता सीताराम प्रल्हाद अघाव याला 'नंबर वन फॅन' म्हणून घोषित करण्यात आले आणि ही ५० लाखांची रक्कम त्या चाहत्याला देण्यात आली. शिवच्या या विजयामुळे त्याचा चाहता एका रात्रीत लखपती झाला आहे.
शिवच्या या प्रवासात एक महत्त्वाचं वळण म्हणजे सेमी-फिनालेचा टास्क. या टास्कमध्ये प्रिन्स नरुलाने फिनालेची तिकीट जिंकली होती, मात्र त्याने ती स्वतःकडे न ठेवता शिव ठाकरेला दिली. प्रिन्सच्या या निर्णयामुळे शिव फायनलिस्ट बनला आणि अखेर त्याने ही ट्रॉफी जिंकली.अमरावतीच्या एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शिव ठाकरेने आजवरचा प्रवास खूप संघर्षातून केला आहे. वर्तमानपत्रे आणि दूध विकण्यापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज रिअॅलिटी शोचा किंग होण्यापर्यंत पोहोचला आहे.