तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:54 IST2025-10-29T13:51:38+5:302025-10-29T13:54:45+5:30
भाभीजी घर पर है मालिकेतून शिल्पा शिंदे कमबॅक करणार का? जाणून घ्या सविस्तर

तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' विजेती शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन येत आहे. ती पुन्हा एकदा 'अंगूरी भाभी' या भूमिकेतून छोट्या पडद्यावर परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिल्पा शिंदेने २०१५ मध्ये सुरू झालेल्या 'भाभी जी घर पर हैं' (Bhabhi Ji Ghar Par Hain) या मालिकेत 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. काही वर्षांपूर्वी शिल्पाने ही मालिका सोडली होती. पण आता ती ९ वर्षांनंतर या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
मालिकेतील वाद आणि एक्झिट
मालिका निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे शिल्पाने २०१६ मध्ये ही मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रे अंगूरी भाभीच्या भूमिकेत मालिकेत दिसली आणि तिनेही प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. शिल्पाच्या एक्झिटनंतर तिने अनेक रिॲलिटी शो आणि प्रोजेक्ट्समध्ये काम केलं, पण 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेची क्रेझ आजही कायम आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा शिल्पा शिंदेला 'अंगूरी भाभी'च्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे. मालिकेच्या कथानकात काही मोठे बदल केले जात असून, या भूमिकेत शिल्पाला परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
या बातमीमुळे शिल्पाच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. शिल्पा शिंदे खरोखरच या आयकॉनिक भूमिकेत परतणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र, शिल्पा किंवा चॅनलकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान या मालिकेमुळे शिल्पाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. शिल्पाची बोलण्याची खास पद्धत, याशिवाय "सही पकडे हैं" हा डायलॉग आणि तिचा साधेपणा यामुळे ही भूमिका खूप गाजली होती. पुढील काही दिवसात शिल्पा पुन्हा मालिकेत दिसणार की नाही, याचं उत्तर सर्वांना कळेल.