'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट, नवीन सीझनचे जज असणार नवज्योत सिंग सिद्धू-नेहा कक्कड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:59 IST2025-08-29T14:59:06+5:302025-08-29T14:59:52+5:30
India's Got Talent Show : 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या नवीन सीझनसाठी ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत. गेल्या सीझनमध्ये किरण खेर आणि शिल्पा शेट्टी यांनी जज केले होते. पण नवीन सीझनमध्ये हे सर्व परिक्षक बदलण्यात आले आहेत.

'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून शिल्पा शेट्टीची एक्झिट, नवीन सीझनचे जज असणार नवज्योत सिंग सिद्धू-नेहा कक्कड
लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India's Got Talent Show) लवकरच त्याच्या नवीन सीझनसह परतणार आहे. शोच्या ऑडिशन्स सुरू झाल्या आहेत आणि दरम्यान शोचे जज करणाऱ्या सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या नवीन सीझनचे सर्व जज बदलण्यात आले आहेत आणि त्यांची जागा नवीन सेलिब्रिटींनी घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये किरण खेर, बादशाह आणि शिल्पा शेट्टी परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार नाहीत.
'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या गेल्या सीझनमध्ये किरण खेर, बादशाह आणि शिल्पा शेट्टी हे शोचे जज म्हणून काम पाहत होते. पण आता पुढच्या सीझनमध्ये नवजोत सिंग सिद्धू, नेहा कक्कड आणि अनुराग कश्यप हे शोचे जज करणार आहेत. यावेळी शोचे होस्टही बदलले आहेत. मागचा सीझन अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केला होता. आता 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा नवीन सीझन हर्ष लिंबाचिया होस्ट करणार आहेत.
किरण खेर यांनी १० सीझननंतर सोडली जजची खुर्ची
'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोच्या पहिल्या सीझनपासूनच ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर या शोमध्ये जज म्हणून दिसल्या होत्या. पण किरण पुढच्या सीझनमध्ये दिसणार नाहीत. याचे कारण त्यांची तब्येत खराब असू शकते. अनुपम खेर यांच्या 'तन्वी- द ग्रेट' या चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान किरण खेर अनुपम खरे यांच्या आधाराने चालताना दिसल्या होत्या.