'शेतकरी नवरा हवा' फेम अभिनेत्याने या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 03:07 PM2023-06-16T15:07:32+5:302023-06-16T15:07:46+5:30

'शेतकरीच नवरा हवा' मालिकेत गुणाजीची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र पोळने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे.

'Shetkari Navara Hawa' fame actor tied the knot with this actress | 'शेतकरी नवरा हवा' फेम अभिनेत्याने या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

'शेतकरी नवरा हवा' फेम अभिनेत्याने या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

googlenewsNext

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच 'लिटील चॅम्प्स' फेम गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी लवकरच लग्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता 'शेतकरीच नवरा हवा' (Shetkarich Navara Hava) मालिकेत गुणाजीची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र पोळ(Jitendra Pol)ने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्याची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लग्नाला मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

अभिनेता जितेंद्र पोळने त्याची गर्लफ्रेंड अस्मिता पांडे हिच्यासोबत गुरूवारी लग्नगाठ बांधली आहे. जितेंद्र पोळ गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. जितेंद्र शरीराने तंदुरुस्त असल्याने कॉलेजमध्ये एका नाटकातील पहिलवानाच्या भूमिकेसाठी त्याला विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. 'जीव माझा गुंतला' या मालिकेत त्याने रॉकीची भूमिका केली होती. 'संत गजानन शेगावीचे' या मालिकेत त्याने दामोदरपंत ही एक महत्वाची भूमिका साकारली होती.


जितेंद्रची पत्नी अस्मिता पांडे हिने 'बायको चटका मेहुणी फटका', 'स्पिचलेस' या चित्रपटात काम केले आहे. 'लागल या याड' या गाण्यामध्येही अस्मिता झळकली आहे. 'कन्यादान', 'अधम', 'मागणी', 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' यासोबत ती एका तेलगू चित्रपटातही तिने काम केले आहे.

Web Title: 'Shetkari Navara Hawa' fame actor tied the knot with this actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.