१९ व्या वर्षी करिअरची सुरुवात, कुटुंबियांचा विरोध अन्...; अशी होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाची फिल्मी कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:35 IST2025-06-28T11:31:13+5:302025-06-28T11:35:13+5:30

Shefali Jariwali Death:'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, मॉडल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालं आहे.

shefali jariwala how get a chance for kanta laga song know about her journey in industry | १९ व्या वर्षी करिअरची सुरुवात, कुटुंबियांचा विरोध अन्...; अशी होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाची फिल्मी कारकीर्द

१९ व्या वर्षी करिअरची सुरुवात, कुटुंबियांचा विरोध अन्...; अशी होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाची फिल्मी कारकीर्द

Shefali Jariwali Death: 'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, मॉडल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालं आहे. शेफालीच्या निधनाच्या बातमीने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली. शेफाली जरीवालाचामृत्यू हृदविकाराच्या झटक्याने आल्याने झाला, असं सांगण्यात येत आहे. ती ४२ वर्षांची होती. शेफालीने एका मुलाखतीत या गाण्याशी संबंधित किस्सा सांगितला होता आणि तिला हे गाणं कसं मिळाले त्याबद्दल देखील खुलासा केला होता.

'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत शेफालीने तिच्या फिल्मी कारकीर्दीवर भाष्य केलं होतं. शेफाली जरीवाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 'कांटा लगा'चे दिग्दर्शक विनय सप्रु आणि राधिका राव यांनी तिला या गाण्यासाठी विचारणा केल्याचं, तिने सांगितलं. शेफालीने कायम अभ्यासाकडे लक्ष द्यावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. 'कांटा लगा' गाण्यासाठी शेफाली प्रचंड उत्सुक होती. मात्र, तिच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. मग वडिलांना विश्वासात घेतल्यानंतर अभिनेत्रीने या प्रोजेक्टमध्ये काम केलं. या गाण्यासाठी अभिनेत्रीला ७ हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं. असं तिने त्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. 

शेफाली जरीवालाने तिचे शिक्षण अहमदाबाद येथे पूर्ण केलं. त्याचदरम्यान, तिला 'कांटा लगा' गाण्याची ऑफर मिळाली आणि तिचा अभिनय प्रवास सुरु झाला. वयाच्या १९ व्या वर्षी शेफालीने कांटा लगा गाण्यातून इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री केली होती. २०१४ साली अभिनेता पराग त्यागी सोबत ती विवाहबद्ध झाली. हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्येही तिने सहभाग दर्शवला होता. याशिवाय सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातही तिने काम केलं. शेफाली आणि पराग अनेकदा इव्हेंटमध्ये एकत्र पाहायला मिळाले, त्यांचा संसारही अगदी सुरळीत सुरू होता. 

Web Title: shefali jariwala how get a chance for kanta laga song know about her journey in industry