Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:03 IST2025-06-28T19:02:47+5:302025-06-28T19:03:46+5:30
Shefali Jariwala Death: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आज शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
ShefaliJariwaliLastRites: 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने २७ जून(शुक्रवारी) शेफालीची प्राणज्योत मालवली. तिच्या अकस्मात निधनाने चाहते, कुटुंबीय आणि सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आज शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मुंबईत शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला शेवटचा निरोप देण्यासाठी नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पती पराग त्यागीने शेफालीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. शेफालीचा अचानक झालेल्या मृत्यूने परागला मोठा धक्का बसला आहे. रडून रडून त्याची अवस्था वाईट झाली आहे. तर शेफालीच्या आईलाही दु:ख अनावर झालं आहे.
'काटा लगा' या गाण्यामुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली होती. तिने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं होतं. वेबसीरिजमध्ये शेफाली दिसली होती. 'बिग बॉस १३'मध्येही ती सहभागी झाली होती. शेफालीने अभिनेता पराग त्यागी याच्याशी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र, तिच्या अचानक झालेल्या निधनाने पराग आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.