"मला आई व्हायचंय, पण.."; शेवटपर्यंत शेफाली जरीवालाच्या मनात होती 'ही' भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:29 IST2025-06-28T12:27:11+5:302025-06-28T12:29:14+5:30

शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. गेली अनेक वर्ष शेफालीच्या मनात एका गोष्टीची भीती होती. काय होतं अभिनेत्रीच्या मनात?

shefali jariwala fear of covid 19 and not become a mother since last breathe | "मला आई व्हायचंय, पण.."; शेवटपर्यंत शेफाली जरीवालाच्या मनात होती 'ही' भीती

"मला आई व्हायचंय, पण.."; शेवटपर्यंत शेफाली जरीवालाच्या मनात होती 'ही' भीती

मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली. शेफाली जरीवालाचं निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या निधनामुळे तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. शेफालीला मुल दत्तक घ्यायचं होतं. तिला आई होण्याची इच्छा होती. परंतु कोविडमुळे शेफालीच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. याविषयी तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता. काय म्हणाली होती शेफाली? जाणून घ्या.

शेफालीच्या मनात होती भीती

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शेफाली जरीवालाने हा खुलासा केला होता. शेफाली म्हणाली होती की, "मला एक मुल दत्तक घ्यायचं होतं. परंतु कोरोना महामारीमुळे या गोष्टीला उशीर झाला. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जेव्हा गोष्टी घडायच्या असतात तेव्हा त्या घडतात. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी बदलल्या. मला अजुनही एखादं मुल दत्तक घ्यावंसं वाटतंय पण माझ्या मनात एक भीती आहे. दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे माझ्या मनात भविष्याबद्दल एक भीती निर्माण झाली आहे."


"मी या काळात अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यामुळे आयुष्य खूप नाजूक आहे, याची मला जाणीव झाली आहे. मला आई होण्याची भीती वाटतेय, पण माझे पती पराग मुलाला दत्तक घ्यायला उत्सुक आहेत. मी जेव्हा पूर्ण तयार असेल तेव्हाच मी मुलाला घरी आणण्याचा विचार करेल. फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकरित्या तुम्ही तयार असलं पाहिजे. मी सध्या तरी एक पाऊल मागे टाकतेय. मी जोवर आत्मविश्वासाने या गोष्टीला सामोरं जात नाही तोवर मी मुल दत्तक घेण्याचा कोणताही विचार करणार नाही." अशाप्रकारे शेफाली जरीवालाने तिच्या मनातील भीती सांगितली होती. शेफालीची अशी एक्झिट अनेकांना चटका लावून गेली आहे.

Web Title: shefali jariwala fear of covid 19 and not become a mother since last breathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.