Shefali Jariwala : "ती माझी बहीण होती...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊ रडला, डोळ्यांतून अश्रू थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:48 IST2025-06-28T14:42:07+5:302025-06-28T14:48:16+5:30

Shefali Jariwala Death : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊला अश्रू अनावर झाले आहेत.

shefali jariwala death bigg boss fame hindustani bhau gets emotional video | Shefali Jariwala : "ती माझी बहीण होती...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊ रडला, डोळ्यांतून अश्रू थांबेनात

Shefali Jariwala : "ती माझी बहीण होती...", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊ रडला, डोळ्यांतून अश्रू थांबेनात

Shefali Jariwala Death : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी(२७ जून) मुंबईत निधन झालं. ४२ वर्षांच्या शेफालीच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेसृष्टी हादरली आहे. तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेफाली जरीवालाच्यामृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊला अश्रू अनावर झाले आहेत. 

हिंदुस्तानी भाऊ आणि शेफाली जरीवाला यांच्यात बहीण भावाचं नातं होतं. बिग बॉस १३ मध्ये ते भेटले होते. तेव्हापासून त्यांच्यात चांगली मैत्री होती. शेफाली हिंदुस्तानी भाऊला राखीदेखील बांधायची. बहिणीच्या निधनाची बातमी समजताच हिंदुस्तानी भाऊला मोठा धक्का बसला आहे. शेफालीबाबत कळताच त्याने कूपर रुग्णालयात धाव घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना हिंदुस्तानी भाऊ भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 


"ती माझी बहीण होती. ती माझ्या कुटुंबाचा एक भाग होती. बहिणीपेक्षा जास्त मी तिला माझी मुलगीच मानायचो. जे काही झालं ते खूप वाईट झालं. मी कधीही विचार केला नव्हता की असं काही होईल. वर्षातून २-३ वेळा फोन दिवसभर माझा फोन वाजायचा. रक्षाबंधन, गणपती आणि भाऊबीजच्या दिवशी ती मला फोन करायची. आता मोबईलमध्ये फक्त तिचं नाव आहे. पण, तिचा फोन कधीच येणार नाही", असं म्हणताना हिंदुस्तानी भाऊच्या डोळ्यांतील अश्रू थांबतच नव्हते. 


शेफाली जरीवाला काटा लगा गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या गाण्याने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर अनेक मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही ती दिसली. 'बिग बॉस १३' मध्येही शेफाली सहभागी झाली होती. याशिवाय 'बुगी वुगी', 'नच बलिये' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. 

Web Title: shefali jariwala death bigg boss fame hindustani bhau gets emotional video