चर्चगेट स्टेशनवरुन जाताना एका माणसाने घाणेरडा स्पर्श केला...; 'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितला प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 11:15 IST2025-10-22T11:14:33+5:302025-10-22T11:15:17+5:30
मी आईसोबत एकदा चर्चगेट स्टेशनवरुन जात होते. रात्री साडेआठ नऊची गोष्ट असेल...

चर्चगेट स्टेशनवरुन जाताना एका माणसाने घाणेरडा स्पर्श केला...; 'पारु' फेम अभिनेत्रीने सांगितला प्रसंग
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा 'पारु' फेम अभिनेत्री शरयू सोनावणे. या मालिकेमुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचा अभिनय, तिचं दिसणं सगळंच प्रेक्षकांना प्रेमात पाडत आहे. नुकतंच शरयूने एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला. तिला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या माणसाला तिने कसा धडा शिकवला हे तिने सांगितलं.
'कलाकृती मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत शरयू सोनावणे म्हणाली, "मी आईसोबत एकदा चर्चगेट स्टेशनवरुन जात होते. रात्री साडेआठ नऊची गोष्ट असेल. चालत असताना बाजूने जाणाऱ्या एका माणसाने मला घाणेरड्या पद्धतीने धक्का दिला. तो हात लावून गेला. तोवर माझी आई पुढे निघून गेली होती. तिला वाटलं मी मागे मागे येईल. पण मी आईच्या मागे न जाता वळले आणि त्या माणसाच्या दिशेने गेले. त्याला थांबवलं, चिमटे काढले, त्याला पाठीत जोरजोरात मारलं आणि थेट पोलिस स्टेशनला घेऊन गेले. 'हा माणूस मला त्रास देतो, बघा...' असं मी पोलिसांना सांगितलं. इतकं सगळं करुन मी आले होते. घाबरुन न जाता प्रत्येक मुलीने हेच केलं पाहिजे. नाहीतर अशा लोकांची हिंमत अजून वाढू शकते."
शरयने याआधी 'पिंकीचा विजय असो'मध्ये पिंकी साकारली होती. ती पिंकी अशीच बिंधास्त होती. तिची भूमिका लोकांच्या अजूनही जास्त लक्षात आहे. अभिनेत्री कायमच मुळमुळीत, रडणारी अशीच नसते तर पिंकीसारखी बिंधास्तही असते हे लोकांना पाहायला मिळालं. पिंकी अशी होती की ती कोणाचंच ऐकून घेणार नाही. समोरच्या दोन कानाखाली मारुन येईल अशी ती होती. त्यामुळे माझी ती आवडती भूमिका आहे कारण मी खऱ्या आयुष्यात तशीच आहे.