या ठिकाणी शमा सिकंदर करतेय एन्जॉय,व्हाईट बिकनीत दिसला बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:14 AM2018-01-04T07:14:19+5:302018-01-04T12:44:19+5:30

चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार त्यांच्या कामांमुळे कमी इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत येतात.असाच काहीसा प्रकार शमा सिंकदरबरोबर घडतो आहे. प्रसिद्धीच्या झोतात ...

Shama Sikandar doing fun at this place, looks bold in white bikini | या ठिकाणी शमा सिकंदर करतेय एन्जॉय,व्हाईट बिकनीत दिसला बोल्ड अंदाज

या ठिकाणी शमा सिकंदर करतेय एन्जॉय,व्हाईट बिकनीत दिसला बोल्ड अंदाज

googlenewsNext
त्रपटसृष्टीतले अनेक कलाकार त्यांच्या कामांमुळे कमी इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत येतात.असाच काहीसा प्रकार शमा सिंकदरबरोबर घडतो आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहयच असेल तर असेच काही बोल्ड फोटो सोसल मीडियावर व्हायरल करत फुल ऑन पब्लिसिटी मिळवायची हे समीकरण शमासाठी तसेही काही नवीन नाही.पुन्हा एकदा शमा चर्चेत आली आहे.त्याला कारण आहे तिचे हे खास फोटो.याच फोटोमुळे सध्या शमावर जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.शेअर केलेल्या फोटोत शमाची प्रत्येक छबी विशेष आणि हटके असल्याचे पाहायला मिळत आहे.शमा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.तेथील विविध स्थळांवरील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.मस्त मनमुराद समुद्रांच्या लाटांसोबत खेळतानाचे अनेक फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहे.ती फक्त तिचे फोटोच अपलोड करत नसून सातत्याने तिच्या अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मीडियावर देत आहे. 


विक्रम भट्टच्या'माया' वेबसीरिजमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.तिच्या याच बोल्डनेसमुळे ती तुफान चर्चेत होती. शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे या वेब सीरीजने खूप पॉप्युलारिटी मिळवली होती.याव्यतिरिक्त ती आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्ये बघावयास मिळाली. त्यामुळे काम कोणतेही असो जिथे शमा असणार तिथे चर्चा झालीच समजा. गेल्याच वर्षी माया ही वेबसिरीज २७ जानेवारी २०१७ ला रिलीज झाली होती. त्यामुळे  गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शमा कोणता धमाका करणार याचीच प्रतिक्षा असल्याचे पाहायला मिळत आहे. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. यास तिचा स्वभाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.कारण दिग्दर्शकांसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असे तिचे धोरण राहिले आहे.काही दिवसांपूर्वी तिने आरोप केला होता की,इंडस्ट्रीमधील एक मोठा दिग्दर्शक तिच्याशी कास्टिंग काउचसाठी अ‍ॅप्रोच झाला होता.त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.एका मुलाखतीत खुद्द शमानेच हा खळबळजनक खुलासा केला होता. 

Web Title: Shama Sikandar doing fun at this place, looks bold in white bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.