'शाका लाका बूम बूम' फेम संजू लवकरच होणार बाबा, खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:05 IST2025-12-14T10:04:08+5:302025-12-14T10:05:13+5:30
किंशुकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'शाका लाका बूम बूम' फेम संजू लवकरच होणार बाबा, खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अर्थात अभिनेता किंशुक वैद्य लवकरच बाबा होणार आहे. किंशुक वैद्य आणि त्याची पत्नी दिक्षा नागपाल यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी कळताच किंशुकच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किंशुक आणि दीक्षा यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये किंशुक आणि दीक्षा यांच्या हातात छोट्या बाळाचे शूज दिसत आहेत. फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात पदार्पण करत आहोत... आमची प्रेमकहाणी आता आणखीनच मधुर झाली आहे".
किंशुक वैद्य आणि दीक्षा नागपाल यांनी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्नगाठ बांधली होती. मराठी पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता. किंशुक आणि दिक्षाचं लव्ह मॅरेज होतं. ते एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते.
किंशुकच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याने 'शका लाका बूम बूम', 'कर्णसंगिनी', 'वो तो है अलबेला', 'जात ना पूछे प्रेम की', 'राधाकृष्ण', 'वो अपना सा', 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकांमध्येही काम केलंय. तर दीक्षा एक प्रोफेशन्ल कोरियोग्राफर आहे. ती टीव्ही, ओटीटी आणि सिनेमांमध्ये तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.