'शाका लाका बूम बूम' मधला संजू आठवतोय ना? अभिनेत्याचा झाला साखरपुडा; शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:10 IST2024-08-24T09:10:03+5:302024-08-24T09:10:50+5:30

कोण आहे संजूची होणारी बायको? ३३ व्या वर्षी केला साखरपुडा

Shaka Laka Boom Boom fame Kinshuk Vaidya engaged to girfriend Diksha Nagpal | 'शाका लाका बूम बूम' मधला संजू आठवतोय ना? अभिनेत्याचा झाला साखरपुडा; शेअर केले फोटो

'शाका लाका बूम बूम' मधला संजू आठवतोय ना? अभिनेत्याचा झाला साखरपुडा; शेअर केले फोटो

'शाका लाका बूम बूम' ही सुपरहिट मालिका आठवत असेलच. ही मालिका अनेकांच्या बालपणीचा भाग आहे. यातील संजू ची भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्य (Kinshuk Vaidya) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याचा साखरपुडा झाला असून त्याने सोशल मीडियावर होणाऱ्या बायकोसोबत फोटोही शेअर केला आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता किंशुक वैद्यने वयाच्या ३३ वर्षी साखरपुडा केला आहे. तो दिक्षा नागपालला डेट करत होता. किंशुकने साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. त्याने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. तर दिक्षाने निळ्या रंगाची साडी  नेसली आहे. दोघंही अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. दिक्षानेच हा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.


अनेक कलाकार किंशुकवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. शाहीर शेख, दिशा परमार, हीबा नवाब यांनी कमेंट करत कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. किंशुक वैद्य याआधी अभिनेत्री शिव्या पठानियाला डेट करत होता. मात्र २०२१ साली त्यांचा ब्रेकअप झाला. 

वर्कफ्रंट

किंशुक वैद्य 'वो तो है अलबेला' शोमध्ये दिसला होता. याशिवाय 'वो अपना सा','एक रिश्ता साझेदारी का','जात ना पुछो प्रेम की' आणि 'कर्ण संगिनी' मध्ये दिसला होता. तर दिक्षा नागपाल इंडस्ट्रीत प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. तिने गाजलेल्या 'पंचायत 2' वेबसीरिजमधील एका गाण्यासाठी ती कोरिओग्राफर होती. 

Web Title: Shaka Laka Boom Boom fame Kinshuk Vaidya engaged to girfriend Diksha Nagpal