​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोप्रा झळकणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:58 IST2018-01-04T12:28:05+5:302018-01-04T17:58:05+5:30

बेपनाह ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होत असून या मालिकेत प्रेक्षकांना आदित्य आणि झोया यांची प्रेमकथा पाहायला मिळणार ...

In this series Jennifer Wingate and Harshad Chopra will be seen in the lead role | ​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोप्रा झळकणार या भूमिकेत

​बेपनाह या मालिकेत जेनिफर विंगेट आणि हर्षद चोप्रा झळकणार या भूमिकेत

बेपनाह ही मालिका लवकरच कलर्स वाहिनीवर सुरू होत असून या मालिकेत प्रेक्षकांना आदित्य आणि झोया यांची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आव्हानात्मक परिस्थितीत त्या दोघांना त्यांचे प्रेम पुन्हा कसे सापडते अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेत जेनिफर विंगेट झोयाच्या भूमिकेत असून हर्षद चोप्रा आदित्यच्या भूमिकेत दिसणार आहे तर सेहबान अझिम पार्थ झोयाच्या पतीची भूमिका साकारणार आहे. तसेच नमिता दुबे पूजाची म्हणजेच आदित्यच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे जेनिफर विंगेटची बेहद ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला. या मालिकेनंतर आता बेपनाह या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेत काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. याविषयी जेनिफर सांगते, या नव्या शो मध्ये काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक असून एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या मालिकेत हर्षद सोबत काम करताना नक्कीच मजा येणार आहे.

Also Read : लहानपणी अशी दिसायची अभिनेत्री जेनिफर विंगेट​

 

बेपनाह या मालिकेत हर्षद चोप्रा प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेविषयी तो सांगतो, बेपनाह या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका आजच्या मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. मी पहिल्यांदाच जेनिफरसोबत काम करत आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असणार असल्याची मला खात्री आहे. या मालिकेत काम करण्याविषयी सेहबान अझिम सांगतो, ही एक रोमँटिक आणि रहस्यमय प्रेमकथा आहे. आपण खऱ्या जीवनात ज्या काही गोष्टींचा सामना करतो त्या गोष्टी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही मालिकेची कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटणार आहे.

नमिता दुबेने आजवर कॉमेडी मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेत ती एका वेगळ्या भूमिकेत झळकत आहे. याविषयी ती सांगते, मी याआधी कॉमेडी मालिकांमध्ये काम केलेले आहे. पण बेपनाह ही एक खूप वेगळी मालिका आहे. एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याने मी खूप खूश आहे.

 

 

Web Title: In this series Jennifer Wingate and Harshad Chopra will be seen in the lead role