"विकृतीची परिसीमा आहे ही.."; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:03 IST2025-03-04T12:02:02+5:302025-03-04T12:03:21+5:30

संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यावर महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी अस्वस्थ करणारी पोस्ट लिहिली आहे (santosh deshmukh)

santosh deshmukh viral photos maharashtrachi hasyajatra director sachin goswami post viiral | "विकृतीची परिसीमा आहे ही.."; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

"विकृतीची परिसीमा आहे ही.."; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

बीडचे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh) यांची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली. संतोष यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील जनतेने तीव्र निषेध नोंदवला. अशातच काल संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हे फोटो पाहून सर्वजण सुन्न झाले. अशातच संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी अस्वस्थ झाले असून त्यांनी पोस्ट केलीय.

सचिन गोस्वामींची संतोष देशमुख प्रकरणावर पोस्ट

सचिन गोस्वामींनी फेसबुकवर संतोष देखमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून त्यांची अस्वस्थ मनोवस्था शेअर केली आहे. सचिन गोस्वामी लिहितात की, "न्यूज चॅनल वरील संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं..विकृतीची परिसीमा आहे ही.. महाराष्ट्र असा नव्हता..दुःखद.." अशा मोजक्या शब्दात सचिन गोस्वामींनी त्यांच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. अनेकांनी गोस्वामींच्या पोस्टखाली कमेंट करुन संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला आहे.



धनंजय मुंडेंचा राजीनामा

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होते. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. 

Web Title: santosh deshmukh viral photos maharashtrachi hasyajatra director sachin goswami post viiral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.