काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:21 IST2026-01-28T14:20:59+5:302026-01-28T14:21:25+5:30

संकर्षण कऱ्हाडेने अजित पवारांसोबतचा एका कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे.

sankarshan karhade condolence post after dcm ajit pawar demise plane crash in baramati | काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, ह्यापेक्षा..., अजित पवारांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित दादांचा मिश्कील स्वभाव, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, हजरजबाबीपणा याचा अनेकदा उल्लेख होतो. आज त्यांच्या आठवणीत सगळेच भावुक झाले आहेत. कलाविश्वातूनही अनेक कलाकारांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केलेली पोस्ट आता व्हायरल होत आहे.

संकर्षण कऱ्हाडेनेअजित पवारांसोबतचा एका कार्यक्रमातला फोटो पोस्ट केला आहे. तो लिहितो, "मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी …काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो… त्यातले अजितदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे… खूप त्रास होतोय… !!! गंभीर प्रश्नांवर पण मिश्कील उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो.. त्यांच्यासह असलेल्या सगळ्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…!!! अजित दादा… खूप आठवण येत राहील …"


याशिवाय सलील कुलकर्णी, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, अश्विनी महांगडे, सायली संजीवसह अनेक कलाकारांनी पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्राने आज एक हरहुन्नरी नेता गमावला आहे. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे.

Web Title : अभिनेता संकर्षण कऱ्हाड़े ने अजित पवार को याद करते हुए भावुक पोस्ट साझा की।

Web Summary : अजित पवार के आकस्मिक निधन के बाद, अभिनेता संकर्षण कऱ्हाड़े ने एक भावभीनी श्रद्धांजलि साझा की, जिसमें पवार के राजनीतिक महत्व और व्यक्तिगत प्रभाव पर प्रकाश डाला गया। कई अन्य कलाकारों ने भी संवेदना व्यक्त की, एक नेता के नुकसान पर शोक व्यक्त किया।

Web Title : Actor Sankarshan Karhade remembers Ajit Pawar, shares heartfelt post.

Web Summary : Following Ajit Pawar's sudden death, actor Sankarshan Karhade shared a touching tribute, reflecting on Pawar's political significance and personal impact. Many other artists have also expressed their condolences, mourning the loss of a leader.