Samir Choughule :"चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा..", समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:47 IST2022-12-03T14:43:12+5:302022-12-03T14:47:04+5:30
समीर चौघुले महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सहकलाकारांसाठी अनेकवेळा सोशल मीडियावर पोस्ट लिहितो.

Samir Choughule :"चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा..", समीर चौघुलेनं दत्तू मोरेसाठी लिहिली 'ती' पोस्ट चर्चेत
मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे समीर चौगुले. उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो.
समीर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. समीरने महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सहकलाकारांच्या वाढदिवसला आवर्जून पोस्ट शेअर करतो. आज दत्तू मोरेच्या वाढदिवसानिमित्तही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
समीरची पोस्ट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Datta More .....आमचा आणि अख्या जगाचा अत्यंत लाडका दत्तू...अत्यंत प्रेमळ आणि निरागस..आणि तीच निरागसता पूर्णपणे त्याच्या अभिनयात उतरते.. चेहराभर दाढी असूनही ती दाढी त्याचा निरागसपणा लपवू शकत नाही हे आमच्या दत्तूचं यश आहे.... दाढी असूनही अख्ख्या जगाने स्वीकारलेला लहान मुलगा अशी आमच्या दत्तूची ओळख आहे...चेहऱ्यावर पराकोटीचा भाबडेपणा आणून संवाद फेकणे हा आमच्या दत्तूचा हातखंडा आहे...तो स्वतः सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या "वेट क्लाउड प्रोडक्शन"मध्ये प्रोडक्शनचं ही काम अत्यंत तन्मयतेने करतो.. दत्तूच्या नावावरून त्याच्या चाळीचं नाव ठेवण्यात आलं ही आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.. यासाठी दत्तू चाळीतल्या सर्व बंधू-भगिनींचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो... अशा या गोड निरागस दत्तूला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... दत्तू तुला आयुष्यात सगळं काही मिळो.....happy birthday मित्रा.....खूप प्रेम.
समीरच्या चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स पाऊस पाडत. दत्तू मोरेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.