Indias Got Latent शो पुन्हा येणार ? समय रैनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:05 IST2025-05-14T15:04:42+5:302025-05-14T15:05:11+5:30

समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Samay Raina Funny Reply On Indias Got Latent Show video goes viral | Indias Got Latent शो पुन्हा येणार ? समय रैनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Indias Got Latent शो पुन्हा येणार ? समय रैनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Samay Raina: 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) हे नावं आता कुणासाठीचं नवं नाही. या शोमुळं कॉमेडियन समय रैनाच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली होती. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्गही होता आणि यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. पण,  पॉडकास्टर रणवीर अलाहबादियानं केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे हा शो बंद झाला आणि समय रैनाला त्याच्या या शोचे सर्व एपिसोड्स YouTube वरून काढून टाकावे लागले. त्याला लोकांच्या नाराजीचा सामना तर करावा लागलाच पण,  यासोबतच  कायदेशीर कारवाईलाही सामोरे  जावं लागलं. या सर्व घडामोडीनंतर आता समयची गाडी रुळावर येत आहे. पण यातच चाहते त्याला 'इंडिया गॉट लेटेंट'चा पुढचा भाग कधी येणार आहे, असे विचारताना दिसतात.

नुकतंच समय रैनाला पापाराझींनी स्पॉट केलं. यावेळी, समयने निळं टी-शर्ट आणि पायजमा घातलेला होता. फोटोसाठी पोझ देत असताना समलयाल एका फोटोग्राफरने विचारलं, "भावा.. शो कधी परत कधी सुरू होणार?". यावर समय "अरे ते तर..." असं म्हणून हसला आणि पापाराझींसमोरून निघून गेला. पुढे जाताना तो दोनदा पापाराझींना वळून पाहत हसताना दिसला. त्यााचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. 


सध्या समय जगभरात लाईव्ह कॉमेडी शो घेतोय.आत लवकच तो एका कॉमेडी टूरवर जाणार आहे. यामध्ये समय हा युरोप, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. त्याचा हा दौरा ५ जून रोजी कोलनमध्ये सुरू होईल आणि २० जुलैला सिडनी येथे संपणार आहे. 

'इंडियाज गॉट लेटेंट'  वाद काय होता? 

'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवर कॉमेडियन समय रैना आणि इतर काही कॉन्टेंट क्रिएटर्सवर अश्लीलता पसरवल्याचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात यूट्यूबर्स अपूर्वा मुखीजा, आशीष चंचलानी, रणवीर अल्लाहबादिया (BeerBiceps) यांच्यासह अनेक लोकप्रिय डिजिटल कलाकारांचा सहभाग होता.  हा वाद एवढा वाढला की खुद्द समय रैनाला गुवाहाटी क्राइम ब्रँचसमोर हजर व्हावं लागलं. ही चौकशी कायदेशीर पातळीवर पोहोचली आणि संपूर्ण शोवर व क्रिएटर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या वादामुळे एकीकडे डिजिटल माध्यमांवरील कटेंटवर एक मत तयार झालं होत, तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही नव्याने चर्चा सुरू झाली होती.
 

Web Title: Samay Raina Funny Reply On Indias Got Latent Show video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.