'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:17 PM2024-01-12T12:17:20+5:302024-01-12T12:19:58+5:30

एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. ​​

Samarth Jurel has been evicted from Bigg Boss 17 after he received the lowest number of votes | 'बिग बॉस 17' च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर

'बिग बॉस 17′ च्या घरात नवा ट्विस्ट, एका झटक्यात 'हा' स्पर्धक झाला बेघर

'बिग बॉसच्या 17' वा सिझन फायनलकडे वळत आहे, तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे.  बिग बॉसच्या घरात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे.  एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. अंतिम फेरीच्या इतक्या जवळ येत असताना, या खेळाडूला 'बिग बॉस 17' ला निरोप द्यावा लागला.

एलिमिनेशनसाठी या आठवड्यात 7 स्पर्धकांना नामांकन देण्यात आले होते. यामध्ये विकी जैन, अभिषेक कुमार, आयशा खान, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अरुण महाशेट्टी आणि समर्थ जुरेल यांच्या नावांचा समावेश होता. अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय वगळता संपूर्ण घर या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. 'बिग बॉस 17' शी संबंधित अपडेटे शेअर करणाऱ्या एका फॅन पेजने इव्हिकशनची माहिती दिली. 'बिग बॉस 17' मधील समर्थ जुरेलचा प्रवास संपला आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

समर्थ जुरेलने 'बिग बॉसच्या 17' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्याच्या एन्ट्री शोमध्ये चांगलीच खळबळ उडाली.  ईशा मालवीय आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड यांच्यातील जवळीक पुन्हा एकदा वाढू लागताच निर्मात्यांनी ईशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल याला शोमध्ये आणले होते. समर्थ जुरेलच्या एन्ट्रीनंतर बिग बॉसच्या घरात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळाला होता. 

 समर्थ जुरेल घराबाहेर पडल्यानंतर आता सध्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, आयशा खान,  ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

Web Title: Samarth Jurel has been evicted from Bigg Boss 17 after he received the lowest number of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.