एका पायाची सर्जरी, दुसऱ्या पायाला फ्रॅक्चर; दिग्दर्शक साजिद खानची झाली वाईट अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:12 IST2026-01-15T16:10:34+5:302026-01-15T16:12:01+5:30
साजिद खानला झालं काय?

एका पायाची सर्जरी, दुसऱ्या पायाला फ्रॅक्चर; दिग्दर्शक साजिद खानची झाली वाईट अवस्था
फिल्ममेकर साजिद खानला दुखापत झाल्याची माहिती त्याची बहीण कोरिओग्राफर फराह खानने दिली होती. आता साजिद नुकताच सिनेमाच्या सेटवर आला होता. यावेळी तो व्हीलचेअरवर आलेला दिसला त्यामुळे चाहते चिंतेत पडले. त्याच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं आहे तर दुसऱ्या पायाची सर्जरी झाली आहे. तरी तो आता हळूहळू बरा होत आहे. पापाराझींशी बोलताना त्याने स्वत: हेल्थ अपडेट दिली.
साजिद खान व्हीलचेअरवर सिनेमाच्या सेटवर आला. त्याला कॅप्चर करण्यासाठी पापाराझी जमले होते. पापाराझींनी त्याची विचारपूस केली. तेव्हा तो गंमतीत म्हणाला, 'बघताय ना कसा दिसतोय? अपघात झाला यार...एका पायाची सर्जरी झालीये, दुसरा पाय फ्रॅक्चर झाला आहे'.
साजिद खान सध्या एका प्रोजेक्टवर काम करत आहे. प्रकृती साथ देत नसतानाही तो सेटवर उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहे. "हळूहळू रिकव्हरी होत आहे, पण सध्या हालचाल करणे कठीण आहे," असेही त्याने पापाराझींशी बोलताना स्पष्ट केले. साजिदच्या या जिद्दीचे सोशल मीडियावर कौतुक होत असून "वर्कहोलिक साजिद" अशा कमेंट्स युजर्स करत आहेत.
साजिदची प्रकृती बिघडल्यानंतर बहीण फराह खान त्याची पूर्ण काळजी घेत आहे. फराहने यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना साजिदसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. साजिद आणि फराह या भावंडांमधील बॉण्डिंग बॉलीवूडमध्ये सर्वश्रुत आहे. भावाच्या या कठीण काळात फराह खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी आहे. साजिद खान लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा एकदा आपल्या जोशात कामावर परतेल, अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.