सहकुटुंब सहपरिवार: अंजी सगळ्यांसमोर देणार पश्याला प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:17 IST2022-03-03T19:16:41+5:302022-03-03T19:17:01+5:30
Sahkutumb Sahaparivar: गेल्या कित्येक दिवसांपासून पश्या अंजीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, काही केल्या त्याला ते शक्य होत नव्हतं.

सहकुटुंब सहपरिवार: अंजी सगळ्यांसमोर देणार पश्याला प्रेमाची कबुली
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. आतापर्यंत या मालिकेत अंजी आणि पश्या यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु, याच प्रवासात ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. विशेष म्हणजे आता सगळ्यांसमोर अंजी तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पश्या अंजीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, काही केल्या त्याला ते शक्य होत नव्हतं. मात्र, आता एका नाटकाच्या निमित्ताने पश्याऐवजी अंजीच तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.
सोशल मी़डियावर सध्या या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अंजी नाटक सुरु असतानाच पश्यासमोर तिच्या प्रेमाची कबुली देते. त्यामुळे या नाटकामुळे आता त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. मात्र, अंजीने दिलेली प्रेमाची कबुली पश्याला समजेल का? अंजीप्रमाणेच तोदेखील त्याचं प्रेम व्यक्त करु शकेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.