"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:07 IST2026-01-16T09:55:02+5:302026-01-16T10:07:05+5:30
बिग बॉस मराठी ६ मध्ये काल सागरने तन्वी कोलतेला चांगलंच झापलेलं दिसलं. त्यामुळे तन्वी रडताना दिसली. काय घडलं?

"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं?
'बिग बॉस मराठी ६' ला सुरुवात झाली आहे. शो सुरु होऊन आता ४ दिवस झाले आहेत. या चारच दिवसांत घरात भांडणाने अक्षरशः कहर केला आहे. अशातच 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात असलेली तन्वी कोलते हिची सध्या खूप चर्चा आहे. तन्वीने काल टास्कमध्ये सागर कारंडेला चांगलंच सुनावलं. त्यामुळे सागरचा संयम सुटला. त्याने मोठ्या आवाजात तन्वीची शाळा घेतली. त्यामुळे घरात हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळाला.
सागर कारंडेचा संयम सुटला
'बिग बॉस मराठी ६'मध्ये काल कॅप्टनसी पदाच्या उमेदवारीसाठी टास्क सुरु होता. या टास्कमध्ये सागर कारंडे , तन्वी कोलते विरुद्ध टीममध्ये खेळत होते. अशातच सागर तन्वीबद्दल इतरांशी काहीतरी बोलत होता. हे ऐकून तन्वी सागरजवळ आली आणि ती सागरला अरे तुरे करायला लागली. बोलता बोलता तन्वी सागरला म्हणाली- ''कॉमेडी करुन लोकांची भांडणं मिटवतो!'' हे ऐकताच सागरचा संयम सुटला. त्याचा आवाज वाढला, ''माझं प्रोफेशन आहे ते. त्यावर जायचं नाय.'' असं सागर तिला म्हणाला.
त्यामुळे तन्वी आतमध्ये निघून गेली. सागरला सर्वजण बाहेर समजावत होते. दिपाली सय्यद, सचिन कुमावत यांनी सागरची बाजू घेतली. त्यांनीही तन्वीला दोष दिला. करण सोनावणेही सागरला समजावत होता. त्यावेळी एकाक्षणी सागरचा संयम सुटला. ''अरे आयचा घो तुझ्या... प्रोफेशन काढते म्हणजे काय... असशील तू मोठी घरी'', असं सागर मोठ्याने म्हणाला. सागरचं रौद्र रुप बघून सर्वजण थक्क झाले. सर्वांनी सागरला शांत करण्याचा प्रयत्न केला. तन्वी आतमध्ये जाऊन रडायला लागली. अशाप्रकारे काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये मोठा ड्रामा बघायला मिळाला.