'साधी माणसं' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय स्वप्नातलं घर; व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:26 IST2025-04-07T13:24:47+5:302025-04-07T13:26:52+5:30
यंदाचं २०२५ वर्ष हे अनेकांसाठी खास ठरलं आहे.

'साधी माणसं' फेम अभिनेता 'या' ठिकाणी बांधतोय स्वप्नातलं घर; व्हायरल व्हिडीओची होतेय चर्चा
Akash Nalawade : यंदाचं २०२५ वर्ष हे अनेकांसाठी खास ठरलं आहे. काही कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याला नवी सुरुवात केली तर काहींनी हक्काचं घर खरेदी करुन स्वप्न पूर्ण केलं. मधुराणी प्रभुलकर, ऐश्वर्या नारकर आणि कपिल होनराव यांसारख्या कलाकारांनी त्यांचं हक्काच घर घेतलं. त्यात आता लोकप्रिय टीव्ही अभिनेता आकाश नलावडेने (Akash Nalawade) सुद्धा सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
आकाश नलावडेने सोशल मीडियावर त्याच्या नव्या घराचं स्वप्न पूर्ण होत असल्याची गोड माहिती दिली आहे. सध्या गावाकडे तो त्याचं ड्रीम होम बनवत आहे. कमिंग सुन... असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिवाय अंडर कन्स्ट्रक्शन, हाऊस कनस्ट्रक्शन तसंच व्हिलेज हाऊस असे हॅशटॅग त्याने दिले आहेत. त्यामुळे अभिनेता त्याच्या मुळगावी नवं घर बांधत असल्याचं कळतंय. त्यामुळे अभिनेत्याचे चाहतेदेखील प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत.
वर्कफ्रंट
आकाश नलावडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं मालिकेत सत्या नावाची भूमिका साकारतो आहे.