'बिग बॉसच्या इतिहासातील वाईट स्पर्धक!', रितेशने जान्हवीला दाखवला बाहेरचा रस्ता, दिली मोठी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:35 IST2024-08-24T15:35:00+5:302024-08-24T15:35:17+5:30
रितेश देशमुखच्या या आठवड्यातील भाऊचा धक्काचा प्रोमो रिलीज झाला असून जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय (bigg boss marathi 5)

'बिग बॉसच्या इतिहासातील वाईट स्पर्धक!', रितेशने जान्हवीला दाखवला बाहेरचा रस्ता, दिली मोठी शिक्षा
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झालाय. आज घरात चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्काचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत रितेशने जान्हवीला चांगलीच अद्दल घडवलेली दिसतेय. इतकंच नाही तर जान्हवीला आज रितेश खऱ्या अर्थाने भाऊचा धक्का देतान दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या प्रोमोत रितेश जान्हवीवर चांगलाच रागावला असून तिला बाहेरचा रस्ता दाखवताना दिसतोय.
रितेशने जान्हवीला दिली मोठी शिक्षा
बिग बॉस मराठीच्या प्रोमोत दिसतंय. रितेश जान्हवीवर चांगलाच रागावलेला दिसतोय. जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनस जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".
भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला स्थान नाही
रितेश देशमुख जान्हवीला सुनावत पुढे म्हणाला,"तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे."
रिेतेश शेवटी म्हणतो, "या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते..लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो." अशाप्रकारे शेवटी रितेश "दरवाजा उघडा रे", असं सांगतो आणि जान्हवी रडत बाहेर जाताना दिसते. आता जान्हवी खरंच घराबाहेर पडणार का? की हे फक्त नाटक आहे? याचा उलगडा आज होईलच