"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:41 IST2025-12-01T11:40:21+5:302025-12-01T11:41:02+5:30
याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांनीही प्रणितला असाच प्रश्न विचारला होता.

"भाऊ, मी तुलाही मानतो...", रितेश देशमुखच्या 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरेने दिलं उत्तर; पाहा Video
'बिग बॉस १९'च्या फिनालेला काहीच दिवस राहिले आहेत. काल झालेल्या 'वीकेंड का वार'मध्ये रितेश देशमुखही आला होता. यावेळी रितेशच बिग बॉसच्या सहाव्या सीझनचा होस्ट असणार हे निश्चित झाले. सलमान आणि रितेश यांना एकत्र स्क्रीनवर पाहून चाहतेही खूश झाले. यावेळी रितेशने घरातील सदस्यांशी संवाद साधला. धमाल मस्ती केली. मराठी स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेला पाहून रितेश काय म्हणाला बघा.
रितेश देशमुख आणि सलमान खान यांनी बिग बॉसच्या मंचावर धमाल केली. दोघांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. रितेश देशमुखने सर्व स्पर्धकांशीही संवाद साधला. प्रणित मोरे रितेशला म्हणतो, 'नमस्कार दादा'. यावर रितेश म्हणतो, 'नमस्कार! सगळ्यांनीच विचारलं मीही विचारतो...माझ्यावर काही जोक केला का?' मग प्रणित म्हणतो, 'नाही नाही दादा, मी सगळ्यांनाच बोलणार, तुलाही बोलतो की मी तुला खूप मानतो'.
याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांनीही प्रणितला असाच प्रश्न विचारला होता. प्रणित मोरे 'बिग बॉस १९'मधला लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याने कॉमेडी करुन सर्वांना खळखळून हसवलं. तसंच आपल्या स्वभावानेही त्याने सर्वांचं मन जिंकलं. म्हणूनच तो इतक्या शेवटपर्यंत टिकून राहिला आहे. आता प्रणित फिनालेपर्यंतही मजल मारणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. ७ डिसेंबर रोजी 'बिग बॉस'चा फिनाले एपिसोड प्रसारित होणार आहे.