खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 11:00 IST2024-05-06T11:00:00+5:302024-05-06T11:00:00+5:30

Reshma shinde: रेश्मासह या गाण्यावर अभिनेत्री भक्ती देसाईने सुद्धा ताल धरला आहे.

Reshma Shinde's amazing dance on Khandeshi song; The beat on 'Dekh Tuni Baiko Kashi Nachi Raini' | खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. उत्तम अभिनयाच्या जोरावर रेश्माने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये रेश्माचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. रेश्माने लोकप्रिय खान्देशी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

रेश्मा सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत लीड रोल साकारात आहे. रंग माझा वेगळाप्रमाणेच रेश्माची ही मालिका सुद्धा अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. यात नुकताच रेश्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' या लोकप्रिय खान्देशी गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री भक्ती देसाईने ताल धरला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'जेव्हा नणंद लग्नासाठी घरी राहायला येते', असं कॅप्शन तिने दिलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Web Title: Reshma Shinde's amazing dance on Khandeshi song; The beat on 'Dekh Tuni Baiko Kashi Nachi Raini'