अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "मेरे सपनो का राजकुमार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:36 IST2024-11-26T15:35:58+5:302024-11-26T15:36:18+5:30

काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. आता अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी अभिनेत्रीचं केळवण केलं आहे. 

reshma shinde kelvan abhidnya bhave and anuja sathe give surprise watch video | अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "मेरे सपनो का राजकुमार..."

अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- "मेरे सपनो का राजकुमार..."

दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचे मुहुर्त गाठले आहेत. काही सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काही लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेची देखील लगीनघाई सुरू आहे. रेश्माही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं. आता अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी अभिनेत्रीचं केळवण केलं आहे. 

अनुजा आणि अभिज्ञाने रेश्माचं केळवण केलं. याचा व्हिडिओ रेश्माने शेअर केला आहे. "मेरे सपनों का राजकुमार आ रहा है...११ वर्ष माझ्या चांगल्या आणि वाईट काळात त्या माझ्याबरोबर होत्या. माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करताना मला अजून काय हवं...हेच माझे आनंदाचे क्षण. लव्ह यू अभिज्ञा आणि अनुजा...मेहुल आणि सौरभ मिस यू", असं कॅप्शन अभिज्ञाने या व्हिडिओला दिलं आहे. 


रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. रेश्माने 'लगोरी -मैत्री रिटर्न्स' या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली. काही सिनेमांमध्येही ती झळकली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने रेश्माला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तिने दीपा ही भूमिका साकारली होती. आता सध्या ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

Web Title: reshma shinde kelvan abhidnya bhave and anuja sathe give surprise watch video