​या कारणामुळे शर्मिला राजारामने स्वीकारली ​मेरे साई ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:15 IST2018-01-04T10:45:05+5:302018-01-04T16:15:05+5:30

शर्मिला शिंदेने पुढचे पाऊल या मालिकेत काम केले होते. तिने या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका प्रचंड गाजली होती. ...

For this reason, Sharmila Rajaram accepted my serial series | ​या कारणामुळे शर्मिला राजारामने स्वीकारली ​मेरे साई ही मालिका

​या कारणामुळे शर्मिला राजारामने स्वीकारली ​मेरे साई ही मालिका

्मिला शिंदेने पुढचे पाऊल या मालिकेत काम केले होते. तिने या मालिकेत साकारलेली रूपाली ही भूमिका प्रचंड गाजली होती. आज ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी आजही तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती साकारत असलेली जेनीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते. खरे तर या मालिकेत शनायाची भूमिका साकारण्यासाठी तिला विचारण्यात आले होते. पण तिने मराठीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत आणि एक कलाकार म्हणून तिला वेगवेगळ्या भाषेतही काम करायचे होते. मराठीत व्यग्र असल्यास हिंदी मालिकांमध्ये काम करणे तिला शक्य होणार नव्हते. त्यामुळेच तिला हा अतिशय कठीण निर्णय घ्यावा लागला. तिने भविष्याचा विचार करूनच शनायाच्या भूमिकेसाठी नकार दिला आणि शनायाऐवजी या मालिकेत जेनीची भूमिका साकारण्याचे ठरवले. पण तिच्या या निर्णयाचा तिला खूप चांगला फायदा झाला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
शर्मिला सध्या मेरे साई या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. शर्मिलाची हिंदी मालिकेत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील शर्मिलाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत काम करण्याचा तिचा अनुभव खूपच चांगला आहे. ही मालिका तिने स्वीकारण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण तिने नुकतेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तिने मेरे साई या मालिकेतील चिऊताई या भूमिकेच्या गेटअपमधील एक फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, मेरे साई या मालिकेतील चिऊ ताई या व्यक्तिरेखेला मी होकार देण्यामागे एक खास कारण होते. माझे नाव शर्मिला असले तरी माझी आई मला खऱ्या आयुष्यात चिऊताई या नावानेच हाक मारते. एवढेच नव्हे तर तिच्या मोबाईलवर माझे नाव चिऊताई म्हणूनच तिने सेव्ह केले आहे. त्यामुळे मी ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आज मी त्याबद्दल प्रचंड खूश आहे. 

Also Read : माझ्या नवऱ्याची बायको फेम शर्मिला राजाराम गेली ब्रेकवर


Web Title: For this reason, Sharmila Rajaram accepted my serial series