तिसरा व्यक्ती आल्याने झाला घटस्फोट? रवीश देसाईने सोडलं मौन, मुग्धा चाफेकरबद्दल म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:14 IST2025-04-07T16:14:17+5:302025-04-07T16:14:48+5:30

मराठी अभिनेत्रीसोबतचा ९ वर्षांचा संसार मोडला, रवीश देसाई म्हणाला...

ravish desai says its not necessary that because of third person two people get divorce talks about mugdha chaphekar | तिसरा व्यक्ती आल्याने झाला घटस्फोट? रवीश देसाईने सोडलं मौन, मुग्धा चाफेकरबद्दल म्हणाला...

तिसरा व्यक्ती आल्याने झाला घटस्फोट? रवीश देसाईने सोडलं मौन, मुग्धा चाफेकरबद्दल म्हणाला...

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल रवीश देसाई (Ravish Desai)  आणि मुग्धा चाफेकर (Mugdha Chaphekar) यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वीच रवीश देसाईने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. 'सप्तरंगी ससुराल' मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. २०१६ ते लग्नबंधनात अडकले होते. आता त्यांचा ९ वर्षांचा संसार इथेच थांबला आहे. दरम्यान तिसऱ्या व्यक्तीमुळेच तुमचा घटस्फोट झाला अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्याने रवीश देसाईने व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

महिलेच्या चारित्र्यावर का संशय घेता?

रवीश देसाई व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "प्रत्येक वेळी तिसऱ्या व्यक्तीमुळेच दोन जण विभक्त झाले हे गरजेचं आहे का? दोन जण एकमेकांच्या सहमतीने एकत्र येतात तसेच ते वेगळेही होऊ शकतात. हे इतकं सोपं का कोणी समजून घेत नाही. जी काही कारणं असतील ती आमची आम्ही बघू. आम्हाला जरा प्रायव्हसी द्या यार. महिलेच्या चारित्र्यावरच का प्रश्न उपस्थित करता? काय मिळतं तुम्हाला? आम्ही खूप साधे लोक आहोत. मला सोशल मीडियावर कोणाशीही वाद घालायचा नाही. एखादी भूमिका उभी करण्यात आयुष्य जातं. एकमेकांशी प्रेमाने वागूया. एवढं तर करुच शकतो. बोलण्यासाठी इतरही बरेच मुद्दे आहेत. लोक मानसिक, भावनिकरित्या अडचणींमधून जात आहेत. इतकी जागरुकता पसरवण्यात आली आहे. मग का आपण त्यांच्या आडचणी अजून वाढवायच्या? मी विनंती करतो आम्हाला प्रायव्हसी द्या."

वर्कफ्रंट

मुग्धा चाफेकर ही मराठी, हिंदी मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे. नुकतीच ती 'कुमकुम भाग्य' मालिकेत दिसली. याशिवाय मुग्धा चाफेकरने २०१८ मध्ये 'गुलमोहर' या मराठी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. यामध्ये ती आरोह वेलणकरसोबत झळकली. नंतर २०२२ मध्ये तिचे 'रुप नगर के चिते' आणि 'जेता' हे दोन मराठी सिनेमे आले.  तर रवीश देसाई 'she','स्कूप' या गाजलेल्या सीरिजमध्ये झळकला. अनन्या पांडेच्या CTRL सिनेमातही तो होता. 

Web Title: ravish desai says its not necessary that because of third person two people get divorce talks about mugdha chaphekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.