​रवीना टंडनने मान्य केले बादशहावरील प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 06:28 AM2017-02-22T06:28:43+5:302017-02-22T11:58:43+5:30

रॅपर किंग बादशहा सध्या दिल है हिंदुस्तानी या मालिकेत परीक्षकाची भूमिका साकारत आहे. त्याने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकून ...

Raveena Tandon admits love on the ocean | ​रवीना टंडनने मान्य केले बादशहावरील प्रेम

​रवीना टंडनने मान्य केले बादशहावरील प्रेम

googlenewsNext
पर किंग बादशहा सध्या दिल है हिंदुस्तानी या मालिकेत परीक्षकाची भूमिका साकारत आहे. त्याने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमादरम्यान त्याची तब्येतदेखील बिघडली होती. त्यामुळे कार्यक्रमाचे चित्रीकरण काही दिवसांसासाठी रद्द करण्यात आले होते. पण आता बादशहाची तब्येत पूर्णपणे चांगली झाली असून त्याने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. 
या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका भागात बादशहाला खूप चांगले सरप्राईज मिळाले. बादशहा रवीना टंडनचा खूप मोठा फॅन आहे. या कार्यक्रमात दाखवलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये बादशहा तिला आवडतो असे तिने सगळ्यांना सांगितले. त्यामुळे सध्या बादशहा सातवे आसमान पे आहे.
बादशहा हा रवीना टंडनचा फॅन असल्याने कर गई चुल या त्याच्या अल्बममधील एक संपूर्ण गाणे त्याने रवीनाला अर्पण केले आहे. बादशहाने तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या ग्लॅमरस रूपाचे कौतुक करणारे एक रॅप गीत तयार केले होते असून या गाण्याचे शब्द... क्या नाचे तू दिल्ली, हिले है लंडन, मटक मटक जैसे रवीना टंडन... असे आहेत.

raveena tandon

बादशहाचे रवीनाप्रेम हे करण जोहरला चांगलेच माहीत आहे. करणदेखील या कार्यक्रमाचे परीक्षण करतो. त्यामुळे त्याने त्याच्या या मित्रासाठी एक खास संदेश रवीनाकडून आणला होता. त्याने हे व्हिडिओ रेकॉर्डिंग नुकतेच या कार्यक्रमात सादर केले. हा संदेश ऐकल्यानंतर बादशहा खूपच खूश झाला होता. एवढेच नव्हे तर हा संदेश ऐकताना तो लाजतदेखील होता. यात मलाही बादशहा आवडतो असे रवीनाने कबूल केले आहे. रवीनाने यात म्हटले आहे की, मला केवळ बादशहाच नव्हे तर त्याची सगळी गाणीदेखील खूप आवडतात. त्याच्या रॅप गायनाची मी चाहती आहे.
टिप टिप बरसा पानी या गाण्यात रवीनाला पाहून मी तिचा चाहता झाल्याचे बादशहा सांगतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बादशहा प्रचंड आनंदित झाला होता.





Web Title: Raveena Tandon admits love on the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.