'डान्स दिवाने'च्या मंचावर रवीना रमली फ्लॅशबॅकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 04:38 PM2018-07-25T16:38:43+5:302018-07-25T16:51:45+5:30

आगामी एपिसोडमध्ये डान्स दिवानेमध्ये रविना टंडन स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येणार आहे.

Raveena Rumble Flashback on 'Dance Diwane' | 'डान्स दिवाने'च्या मंचावर रवीना रमली फ्लॅशबॅकमध्ये

'डान्स दिवाने'च्या मंचावर रवीना रमली फ्लॅशबॅकमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देकरण आणि मनीषाने रवीनाच्या लोकप्रिय गाणं 'टिप टिप बरसा पानी'वर दमकदार कामगिरी सादर केलीरवीना काहीशी आपल्या फ्लॅशबॅक आठवणीत रमली होती

कलर्सच्या 'डान्स दिवाने' ने भारतातील 3 पिढ्यांना एकाच मंचावर त्यांचे डान्सवरील प्रेम दाखविण्यासाठी एकत्र आणल्यामुळे या संकल्पनेला संपूर्ण देशातून पसंती मिळवतेय. प्रत्येत आठवड्यात स्पर्धक आपला दमदार परफॉर्मेन्स सादर करत स्पर्धा अजूनच कठीण करतायेत. आगामी एपिसोडमध्ये डान्स दिवानेमध्ये रविना टंडन स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येणार आहे.

करण आणि मनीषाने रवीनाच्या लोकप्रिय गाणं 'टिप टिप बरसा पानी'वर दमकदार कामगिरी सादर केली आणि ही या एपिसोडचा सर्वोत्तम परफॉर्मेन्स आहे. त्यामुळे रवीना काहीशी आपल्या फ्लॅशबॅक आठवणीत रमली होती. परीक्षकांना करण आणि मनीषाचा हा डान्स परफॉर्मेन्स खूपच आवडला. रविना तर तिच्या गाण्यावर डान्स केल्याने आनंदित झाली होती. जेव्हा माधुरीने रवीनाच्या या गाण्यातील सादरीकरणाची स्तुती केली तेव्हा भारावून गेलेल्या रवीनाने लगेच सांगितले, “आज मला जे काही हवे होते ते सगळे मिळाले असे मला वाटत आहे. कारण माधुरीने स्वतः या गाण्यातील माझ्या डान्सची स्तुती केली आहे. रवीनाने गंमतीने सांगितले, “हा माझ्यासाठी पप्पू पास हो गया सारखा क्षण आहे, कारण माझ्या डान्सच्या चालींची स्तुती दुसऱ्या कोणाकडून नाही तर माधुरी कडून झाली आहे. हा माझ्यासाठी खरोखरंच एक विशेष दिवस आहे.”

काही दिवसांपूर्वीने माधुरीने देखील तिच्या डान्सशी संबंधीत तिच्या आयुष्यातील एक गोष्ट यामंचावर शेअर केली होती माधुरीने सांगितले होते की, “ माझ्या आईचे डान्सर बनण्याचे स्वप्न होते पण काही परिस्थितीमुळे ती ते पूर्ण करू शकली नाही. पण जेव्हा तिने मला डान्स करताना पाहिले तेव्हा तिला तिचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले आणि तिला आनंद झाला कारण तिचा विश्वास आहे की मी तिचे स्वप्न जगते आहे.” आई नेहमीच विशेष असते, मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या नेहमीच त्यांच्या इच्छांना मुरड घालतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी शक्य ते सर्व काही करतात.
 

Web Title: Raveena Rumble Flashback on 'Dance Diwane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.